advertisement

आधी बाबासाहेबांना वंदन, नंतर बाप्पाचं दर्शन, मंत्रालयात सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारला, पार्थ पवारांना अश्रू अनावर

Last Updated:
सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताना पाहून पुत्र पार्थ पवार भावनिक झाले.
1/7
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला.

2/7
या ऐतिहासिक प्रसंगी श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत, सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी, युवक आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्याच्या प्रगतीसाठी पारदर्शक, संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

3/7
कार्यभार स्वीकारताना उपस्थित मान्यवर, वरिष्ठ अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

4/7
सुनेत्रा पवार कार्यभार स्वीकारताना पाहून पुत्र पार्थ पवार भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. दिवंगत नेते अजित पवार यांनी आतापर्यंत सहा वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवले होते.

5/7
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

6/7
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, युवा नेते पार्थ अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

7/7
त्यानंतर सुनेत्रा अजित पवार यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement