Gold Silver Prices Today: सोनं-चांदी आजही धडामधूम! जाणून घ्या कितीने झालं स्वस्त
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Gold Rate Today: सोनं-चांदीच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरुच आहे. आज सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळतेय. तर चांदीही स्वस्त झाली आहे.
Gold Rate Updates: सोन्या चांदीच्या किंमतीत आज घसरण पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर गोल्ड रेट 0.40 टक्क्यांच्या घसरणीसह ओपन झाला आहे. यासोबतच चांदीचा भावही आज कमी झालाय. चांदीचा भाव जवळपास 1 टक्क्यांनी खाली ओपन झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही घसरण पाहायला मिळाली आहे. या व्यतिरिक्त इंटरनॅशनल मार्केटमध्येही घसरण पाहायला मिळाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्थानिक बाजारपेठेतील ही घसरण सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकते, कारण ती थोडी कमी किमतीत उपलब्ध आहे. तसंच, दीर्घकालीन गुंतवणूकदार अजूनही ही एक चांगली संधी मानू शकतात, कारण मौल्यवान धातू सुरक्षित गुंतवणूक मानल्या जातात. बाजारात अनिश्चितता कायम आहे, जसे की यूएस फेड धोरणे आणि जागतिक आर्थिक निर्देशकांबद्दल, म्हणून व्यापाऱ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
advertisement
सोन्या-चांदीवर एक्सपर्टचा सल्ला काय? : मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, बाजाराच्या नजरेत अमेरिकेहून येणाऱ्या GDP, PMI, नॉन-फार्म पेरोल आणि महागाई आकड्यांवर राहील. यासोबतच चीन, जर्मनी आणि भारताचे महागाई आकडेही गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे राहतील. त्याच वेळी, अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेचा थेट परिणाम सोने आणि चांदीच्या किमतींवर होऊ शकतो.








