मिरचीचा ठसका कोलेस्ट्रॉलवर भारी! हिरव्या मिरचीचे झणझणीत फायदे वाचून व्हाल थक्क

Last Updated:
अन्नपदार्थांना झणझणीत ठसका देण्याचं काम मिरची करते. विशेषतः आपल्या भारतीयांना चमचमीत आणि तिखट पदार्थ प्रचंड आवडतात. म्हणूनच भारतात जवळपास प्रत्येक किचनमध्ये तिखट मसाला आणि हिरवी मिरची असतेच. ही हिरवी मिरची पदार्थांना केवळ तिखट बनवण्याचं काम करत नाही, तर ती आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असते. डॉक्टर विद्या गुप्ता यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. (सिमरनजीत सिंह, प्रतिनिधी / शाहजहांपूर)
1/5
हिरव्या मिरचीत व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होते. म्हणूनच आहारतज्ज्ञ जेवणात हिरव्या मिरचीचा समावेश आवर्जून करण्याचा सल्ला देतात.
हिरव्या मिरचीत व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होते. म्हणूनच आहारतज्ज्ञ जेवणात हिरव्या मिरचीचा समावेश आवर्जून करण्याचा सल्ला देतात.
advertisement
2/5
हिरव्या मिरचीमुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमालीची वाढते. शिवाय यात बीटा कॅरोटिन आणि व्हिटॅमिन सीचं प्रमाणही भरपूर असतं. बीटा कॅरोटिनमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. शिवाय व्हिटॅमिन सीमुळे आजारपणाशी लढण्याची ताकद मिळते.

3/5
दररोज मिरची खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहतं. कारण हिरव्या मिरचीत असलेल्या कंपाउंड कॅप्साइसिनमुळे भूक आणि फॅट दोन्ही नियंत्रणात राहतं. त्यामुळे वजन कमी होण्यास आपसूक मदत मिळते.
दररोज मिरची खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहतं. कारण हिरव्या मिरचीत असलेल्या कंपाउंड कॅप्साइसिनमुळे भूक आणि फॅट दोन्ही नियंत्रणात राहतं. त्यामुळे वजन कमी होण्यास आपसूक मदत मिळते.
advertisement
4/5
हिरव्या मिरचीला नॅचरल पेन रिलीव्हरदेखील म्हणतात. यात असलेल्या कंपाउंड कॅप्साइसिनमुळे अंगदुखीवर आराम मिळतो. हे कंपाउंड नर्व्ह्स सिस्टमच्या आत जाऊन दुखणं कमी करतं. महत्त्वाचं म्हणजे ऍसिडमुळे होणाऱ्या हार्टबर्नवरही हिरवी मिरची रामबाण असते.

5/5
 शरिरातलं बॅड  कमी करणं,  नियंत्रणात ठेवणं, हृदयरोगांपासून शरिराचं रक्षण करणं, इत्यादी हिरव्या मिरचीचे अनेक  फायदे आहेत. परंतु लक्षात घ्या, ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित असली तरी आपण आपल्या आरोग्यासंबंधित, आहारासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
शरिरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणं, ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवणं, हृदयरोगांपासून शरिराचं रक्षण करणं, इत्यादी हिरव्या मिरचीचे अनेक आरोग्यपयोगी फायदे आहेत. परंतु लक्षात घ्या, ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित असली तरी आपण आपल्या आरोग्यासंबंधित, आहारासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement