advertisement

Isha Jagtap

भाज्यांचे दर, शाळांची फी, पावसाची स्थिती, शेअर मार्केटची उसळी, गुन्हेगारी वृत्ती, ऑलिंपिकची बाजी, सिनेसृष्टीतील गंमती अन् राजकारणाची माहिती...इथपासून ते अगदी ग्रह, ताऱ्यांच्या अभ्यासापर्यंत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात कामाची बातमी. आमच्या 'लोकल 18' या खास विभागाच्या उपसंपादिका ईशा जगताप 6 वर्षांहून अधिक काळापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारिता विषयात ९१ टक्के गुणांनी पदव्युत्तर पदवीधर होऊन त्यांनी या क्षेत्रात स्वत:ला झोकून दिलं. लेखन, निवेदन, रिपोर्टींग, व्हॉइस ओवर, स्पेशल स्टोरी, एडिटिंग अशा विविध कामांचा त्यांना अनुभव आहे. १०० वर्षांचा सुवर्ण इतिहास घेऊन सुरू असलेल्या 'नवाकाळ' या वृत्तपत्राच्या वेबसाइटपासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. पुढे बरीच वर्षे त्यांनी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर निवेदन केलं. कृषीदर्शन, आमची माती आमची माणसं, एक भारत श्रेष्ठ भारत, हॅलो सह्याद्री, इत्यादी अजरामर कार्यक्रमांच्या निवेदनाचा अनुभव त्यांना आहे. न्यूज18 लोकमतच्या सोशल मीडियासाठीदेखील त्या निवेदन करतात. 'कामाला कलेची जोड असली की, आयुष्य समृद्ध होतं' असं त्या म्हणतात. त्या स्वत: साल २०१०पासून शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेत आहेत. 

advertisement
advertisement

सुपरहिट बॉक्स