WhatsApp च्या कोट्यवधी यूझर्ससाठी गुडन्यूज! आलंय नवं फीचर

Last Updated:

WhatsAppमध्ये आणखी एक नवीन फीचर आले आहे. जे यूझर्सचा अनुभव आणखी सुधारेल. हे फीचर्स सर्व व्हॉट्सॲप यूझर्ससाठी आणले गेले आहे.

व्हॉट्सअॅप
व्हॉट्सअॅप
मुंबई : WhatsApp हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कंपनी सतत त्यात नवनवीन फीचर्स जोडत राहते. मेटाच्या या मेसेजिंग ॲपच्या लेटेस्ट अपडेटसह, आणखी एक नवीन फीचर जोडले गेले आहे. जे यूझर्सचा चॅटिंग एक्सपीरियन्स आणखी सुधारेल. काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की, व्हॉट्सॲपचा लूक बदलणार आहे. या मेसेजिंग ॲपमध्ये आता टायपिंग इंडिकेटर जोडण्यात आले आहे, ज्यामुळे चॅटिंगचा अनुभव अधिक चांगला होईल.
नवीन फीचर चॅटिंगला मनोरंजक बनवेल
व्हॉट्सॲपच्या या टायपिंग इंडिकेटर फीचरमध्ये यूजर्सना मेसेज टाइप करताना व्हिज्युअल साइन दिसेल. हे फीचर वन ऑन वन किंवा ग्रुप चॅट या दोन्हीमध्ये काम करेल. अलीकडेच कंपनीने ॲपमध्ये व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट्स फीचर जोडले आहे. ज्याद्वारे यूझर्स व्हॉइस मेसेजचे ट्रान्सक्रिप्ट वाचू शकतात. हे फीचर बोरिंग '...' साइनच्या ऐवजी व्हिज्यूएल क्यू दाखवले. हे क्यू चॅट विंडोच्या सर्वात खाली दिसेल. यामध्ये समोर येणाऱ्या यूझर्सच्या प्रोपाइल पिक्चरसोबत हा क्यू दिसेल.
advertisement
सध्याचे '...' इंडिकेटर चॅट विंडोच्या वर दिसते. नवीन टायपिंग इंडिकेटर चॅट विंडोच्या खालच्या बाजुला दिसेल. हा फीचर सांगेल की दुसरा यूझर काहीतरी टाइप करत आहे. हे फीचर पहिल्यांदा काही बीटा टेस्टरला ऑक्टोबरमध्ये दाखवण्यात आले होते. हे फीचर आता सर्व Android आणि iOS उपकरणांसाठी आणले गेले आहे. हे अपडेट तुमच्या फोनमध्ये आढळले नाही, तर तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. हे फीचर टप्प्याटप्प्याने रोल आउट केले गेलेय. अशा परिस्थितीत, ते तुमच्या रीजनमध्ये येण्यासाठी काही दिवस लागू शकतात.
advertisement
व्हॉट्सॲप स्कॅमवर सरकार कठोर
व्हॉट्सॲपवरून होणाऱ्या घोटाळ्यांबाबत सरकार कठोर आहे. MeitY ने WhatsApp ची मूळ कंपनी Meta ला हे थांबवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. अलीकडेच, गृह मंत्रालयाच्या सायबर सुरक्षा शाखा, I4C ने डिजिटल फसवणुकीशी संबंधित 59,000 हून अधिक व्हॉट्सॲप अकाउंटवर बंदी घातली आहे. चालू हिवाळी अधिवेशनात सरकारने ही माहिती संसदेत दिली आहे. नोटीसमध्ये सरकारने सोशल मीडिया ॲप्स फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मेटा प्लॅटफॉर्मच्या व्हॉट्सॲपकडून उत्तरे मागितली आहेत.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp च्या कोट्यवधी यूझर्ससाठी गुडन्यूज! आलंय नवं फीचर
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement