Love Horoscope: अचानक पहिलं प्रेम डोळ्यासमोर येईल! आजचं लव्ह राशीफळ कोणासाठी कसं असेल
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Today Love Horoscope in Marathi for December 07, 2024: आयुष्यात प्रेम महत्त्वाचे आहे. प्रियकर-प्रेयसी किंवा जोडीदार हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असतो. त्याच्यासोबतचे आपले संबंध कसे राहतात, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. 07 डिसेंबर 2024 लव्ह राशीफळ जाणून घेऊ.
मेष : तुम्ही आज नियंत्रण ठेवण्याचा जास्त प्रयत्न कराल. प्रथमदर्शनी ते खूप चांगलं वाटेल; मात्र त्यामुळे इतर व्यक्ती लवकर थकतात आणि त्यामुळे काही वेळा तुमच्या प्रिय व्यक्ती घाबरूही शकतात. इतरांच्या आयुष्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्यापैकी काही जण विचार करतील, की 'तू एक तर माझ्यासोबत असशील नाही, तर माझ्या आयुष्याबाहेर असशील.' मात्र असा अल्टिमेटम देण्याआधी तुम्ही तसं जगू शकता, याची खात्री करून पाहा. थोडक्यात सांगायचं झालं तर आज अधिक जुळवून घेणारे व्हा.
वृषभ : आज तुमच्या जोडीदाराच्या तुलनेत तुम्ही भविष्याकडे अधिक पाहणारे आणि सद्यस्थितीत कमी अडकलेले आहात. तुमचा जोडीदार मात्र कालचक्रात अडकलेला आहे. तुम्हाला दोघांना असलेल्या समस्यांसाठी तो किंवा ती कदाचित तुम्हाला दोष देईल. ही प्रक्रिया तुमच्यासाठी किती कठीण असेल, याची त्यांना कल्पना नसेल. दुसऱ्या दिशेने जाण्यासाठी तुम्ही नियोजन करण्यास सुरुवात कराल.
advertisement
मिथुन : आज तुमच्या संयमाची परीक्षा पाहिली जाईल. तुमच्या कामाची जबाबदारी आणि रोमँटिक लाइफ यांच्यामध्ये लढाई होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या वेळेचं समान विभाजन करून तुमच्या जवळच्या सगळ्या लोकांना ते वाटणं तुम्हाला शक्य नाही. काळजी करू नका. उद्याचा दिवस वेगळा असेल. कोणत्याही वादात न अडकता दिवस व्यतीत करण्याचा प्रयत्न करा.
कर्क : आज जोडीदाराला उद्देशून तुम्ही कोणते शब्द वापरता, काय बोलता त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुमचा तसा उद्देश नसला, तरीही तुम्ही टीका किंवा अपमान करताय असं वाटू शकतं. दाबून ठेवलेला राग प्रत्येक चुकीच्या संधीच्या वेळी उफाळून वर येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या शब्दांमध्ये उपरोधिकपणा दिसू शकतो. तुमचे विचार, देहबोली आणि संवादाच्या सर्व प्रकारांवर लक्ष ठेवा. सावध असलात, तर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होण्यापासून प्रतिबंध करू शकाल.
advertisement
सिंह : समस्या कशी सोडवावी, याबद्दल तुम्ही आणि जोडीदार यांच्यामध्ये पूर्णतः असहमती आहे. तुम्ही द्विधा मनःस्थितीत आहात. दुखावलं जाण्याची जोखीम आहे. जोडीदाराशी वाद घालण्याऐवजी एकी करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे रिलेशनशिप वाचेल.
कन्या : आज गोड बोलण्यामुळे तुम्ही खास व्यक्तीच्या विश्वासाच्या सर्कलमध्ये याल. खास मैत्री किंवा रोमँटिक रिलेशनशिपवर खूप भर द्याल. तुम्हाला ज्या माणसाचं ऐकून घ्यावंसं वाटतंय त्या माणसाला आता थोडी स्पेस दिलीत तर चांगलं होईल.
advertisement
तूळ : तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यामध्ये आज वाद होण्याची शक्यता आहे. कारण तुम्हाला असं वाटू शकतं, की तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्यावर अधिकार गाजवण्याची गरज वाटते. अर्थातच हा भास आहे. तुमच्या स्वतःव्यतिरिक्त कोणीही तुमचा बॉस नाही. काही वेळा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला असा विचार करायला द्यायला हवा, की तो किंवा ती एक नंबरवर आहे आणि सगळ्या गोष्टी शांतपणे हाताळतो/हाताळते.
advertisement
वृश्चिक : काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशा पद्धतीने समाविष्ट झालेल्या असतात, की काही कारणाने नातेसंबंध ताणले गेले, तर तुम्हाला एखादा हात किंवा पाय गमावल्यासारखं वाटतं. तुमच्यात मतभेद असू शकतात; मात्र त्याचा परिणाम तुमच्या प्रिय व्यक्तीबद्दलच्या भावनांवर होऊ देऊ नका. आज महत्त्वाच्या रिलेशनशिपमधल्या समस्या दूर करा. आजच हे महत्त्वाचं काम सुरू करा.
advertisement
धनू : तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यामध्ये सारं काही सुरळीत करण्यासाठी आज तुम्ही काहीही करण्यास तयार असाल. पूर्वी समस्या असल्या तरीही तुम्ही ते मागे सोडून नवा अध्याय सुरू करण्यास तयार आहात, याची तुमच्या मनाशी स्पष्टता आहे. अशा दृष्टिकोनामुळे तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या रिलेशनशिपला आणखी एक संधी देण्याची शक्यता वाढेल.
advertisement
मकर : आज जोडीदारासोबत किंवा प्रिय व्यक्तीसोबत मुद्द्यांची चर्चा करणं कठीण आहे. कदाचित तुम्ही दोघंही घाईत असाल किंवा कदाचित तुमच्या प्रिय व्यक्तीला ज्याबद्दल बोलायचं आहे, त्या विषयाबद्दल बोलण्याच्या तुम्ही मूडमध्ये नसाल. कारण काहीही असलं, तरी संवाद नीट झाला नाही तर वाद होऊ शकतात. आजच्या दिवसात नंतरच्या काळात तुम्ही दोघंही काही गैरसमज असल्यास ते दूर करण्यासाठी काही वेळ घ्याल. टेन्शन कमी करण्यासाठी मार्ग शोधा. कारण टाळणं हा उपाय नाही.
कुंभ : आज कलाकार तुमच्याकडून अपेक्षा करू शकतो. तो/ती तुमच्याशी अधिक वारंवार संपर्क साधील, खर्चांचा अंदाज विचारील किंवा काही तक्रारींबद्दल पाठपुरावा करील. तुम्ही त्याच्या किंवा तिच्याप्रमाणे व्हायचं की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमचा जोडीदार अत्याचारी असेल, तर तुम्ही का तसं होताय? दोघांनाही उपयुक्त ठरतील असे बदल जीवनशैलीत किंवा आरोग्यासाठी करण्याची गरज तुम्हाला जाणवत असेल, तर ते चांगलं होईल. कणखर व्हा आणि स्वतःसाठी उभे राहा.
मीन : प्रेम, मजा, आकर्षण आणि दूर जाणं यांचा आज आश्चर्यकारक अनुभव घ्याल. त्यातून काही मजा घेण्याचा प्रयत्न केल्यास ती मिळेल. जोडीदारासाठी वेळ काढण्याकरिता आवर्जून आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करा. उद्याचा विचार न करता चांगला वेळ व्यतीत करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2024 10:43 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Love Horoscope: अचानक पहिलं प्रेम डोळ्यासमोर येईल! आजचं लव्ह राशीफळ कोणासाठी कसं असेल