Shani Rekha: तळहातावर शनी स्थान कुठं असतं? ठळक शनिरेषा असल्यास असे होतात फायदे
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Rekha Tips: शनी आयुष्यात स्थिरता आणू शकतो, शनी कृपा राहावी यासाठी सगळे प्रयत्न करतात. हस्तरेषाशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान त्याच्या हातावरील रेषा आणि चिन्हांवरून ओळखले जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये काही प्रमुख रेषा असतात, ज्यामुळे त्याला कमी वयात चांगली संपत्ती मिळू शकते.
advertisement
advertisement
advertisement
समाजात वेगळी ओळख - हस्तरेषा शास्त्रानुसार बृहस्पति पर्वतावरून येणारी रेषा शनी पर्वतापर्यंत पोहोचली तर अशा व्यक्तीचे मन शुद्ध असते. तसेच, ते पैसे कमावण्यातही पुढे असतात. या लोकांना लक्झरी लाईफ जगायला आवडते. समाजात ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. हे लोक काहीसे हट्टी स्वभावाचे असतात. ते कोणतेही करिअर करत असले तरी त्यात यश मिळवतात.
advertisement
मोठे उद्योगपती होतात - एखाद्या व्यक्तीच्या हातातील रेषा आयुष्य रेषेपासून लांब होऊन शनी पर्वतापर्यंत पोहोचली असेल तर ही स्थिती अत्यंत शुभ असते. अशी रेषा असलेली व्यक्ती आपल्या मेहनतीने प्रत्येक कामात यश मिळवते. पण अशी रेषा तुटलेली असू नये. हे लोक स्वादिष्ट पदार्थ खाण्याचे शौकीन असतात. याशिवाय हे लोक व्यवसाय करण्यातही निष्णात असतात आणि व्यवसायात जोखीम घेण्यास ते घाबरत नाहीत. हे लोक 35 वर्षांच्या वयानंतर खूप पैसे कमावतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)