advertisement

Mumbai News : मुंबईच्या 'या' भागात गॅस गायब; पाईपलाईन बंद झाल्याने गृहिणींची मोठी गैरसोय

Last Updated:

Mumbai News : मुंबईतील दादर, प्रभादेवी आणि सिद्धिविनायक मंदिर परिसरात घरगुती गॅस पाईपलाईन अचानक बंद झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

News18
News18
मुंबई : मुंबईतील दादर, प्रभादेवी आणि सिद्धिविनायक मंदिर परिसरात अनेक ठिकाणी घरगुती गॅस पाईपलाईन अचानक बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. या भागातील काही इमारतींमध्ये काही तासांपाून गॅस पुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वयंपाकासाठी वापरला जाणारा घरगुती पाईपलाईन गॅस बंद झाल्याने अनेक घरांमध्ये जेवण बनवणे कठीण झाले आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅस पुरवठा नेमका का बंद करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. संबंधित गॅस कंपनीकडूनही अधिकृत कारण जाहीर करण्यात आलेले नाही.
दरम्यान काही ठिकाणी देखभाल किंवा तांत्रिक बिघाडामुळे तात्पुरता गॅस पुरवठा बंद करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी गॅस पुरवठा कधी सुरू होणार याबाबत प्रशासनाकडे चौकशी सुरू केली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबईच्या 'या' भागात गॅस गायब; पाईपलाईन बंद झाल्याने गृहिणींची मोठी गैरसोय
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement