बिनधास्त हसा, मोत्यासारखे चमकतील दात, तोंडातून येणार नाही वास, टूथपेस्टमध्ये मीठ नाही 'हे' घाला!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Teeth Whitening Tips : वयानुसार दात पडणं, त्यांना किड लागणं साहजिक आहे. मात्र जर त्याआधीच हे सगळं झालं तर हसायलाही लाज वाटते. त्यात तोंडातून दुर्गंधी येऊ लागली तर कुठे तोंड उघडण्याचीही पंचाईत होते. परंतु काळजी करू नका, आपण काही घरगुती उपाय करून दात आणि तोंड दोन्ही निरोगी ठेवू शकता.
advertisement
नारळाच्या तेलामुळे केसांना भरभरून पोषण मिळतं हे आपल्याला माहित असेलच. परंतु हे माहित नसेल की, नारळाच्या तेलात भरपूर अँटि-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे दातांमधले जंतूही नष्ट करू शकतात. त्यासाठी सकाळी उपाशीपोटी चमचाभर नारळाचं तेल 10 ते 15 मिनिटं तोंडात घुसळण्याचा सल्ला दिला जातो. नारळ तेल थुंकल्यानंतर कोमट पाण्यानं चूळ भरावी. यामुळे काही आठवड्यांमध्येच आपल्याला आपल्या दातांमध्ये फरक दिसू शकतो.
advertisement
advertisement
advertisement