advertisement

PAK vs BAN : मॅच 50 ओव्हरची, पण 15 ओव्हरमध्येच पाकिस्तान 'खेळ खल्लास', कॅप्टन शाहीनने कुणावर फोडलं पराभवाचं खापर?

Last Updated:

Pakistan captain Shaheen Shah Afridi Statement : 50 ओव्हरच्या मॅचमध्ये पाकिस्तानचा संघ फक्त 30 ओव्हरमध्ये ऑल आऊट झाला अन् बांगलादेशने 15 ओव्हरमध्येच मॅच नावावर केली. बांगलादेशसमोर विजयासाठी फक्त 115 धावांचं लक्ष होतं.

Pakistan captain Shaheen Shah Afridi Statement
Pakistan captain Shaheen Shah Afridi Statement
Pakistan vs Bangladesh ODI : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर होऊन पाकिस्तानला दोन आठवडे पूर्ण झाले तरी देखील पाकिस्तानच्या डोक्यातून टी-ट्वेंटी भूत उतरत नसल्याचं पहायला मिळतंय. बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात वनडे मालिका खेळवली जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव झाला. 50 ओव्हरच्या मॅचमध्ये पाकिस्तानचा संघ फक्त 30 ओव्हरमध्ये ऑल आऊट झाला अन् बांगलादेशने 15 ओव्हरमध्येच मॅच नावावर केली. बांगलादेशसमोर विजयासाठी फक्त 115 धावांचं लक्ष होतं.

नाहिद राणाची भेदक बॉलिंग

बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा कॅप्टन शाहीन शाह आफ्रिदी याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शाहीन शाह आफ्रिदीने मान्य केलं की, टीमला ज्या प्रकारच्या सुरुवातीची अपेक्षा होती, तशी सुरुवात या पहिल्या मॅचमध्ये होऊ शकली नाही. नाहिद राणा याने अतिशय भेदक बॉलिंग केली आणि त्याने पाकिस्तानच्या बॅटिंग लाईनअपला अडचणीत आणलं, असं म्हणत शाहीनने नाहिद राणावर पराभवाचं खापर फोडलं.
advertisement

आमची एक तरुण टीम - शाहीन शाह आफ्रिदी

पराभवानंतर बोलताना शाहीन म्हणाला की, जेव्हा तुम्ही मॅच हरता तेव्हा चर्चा करण्यासाठी अनेक मुद्दे असतात. मात्र, ही एक तरुण टीम असून मी या खेळाडूंच्या पाठीशी शेवटपर्यंत खंबीरपणे उभा राहीन. पहिल्या मॅचमधील निकाल जरी विरोधात असला, तरी अजून 2 मॅच शिल्लक आहेत आणि आमची टीम त्या आव्हानांसाठी पूर्णपणे तयार आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
advertisement

दमदार पुनरागमन करण्याचा निर्धार

दरम्यान, कॅप्टन म्हणून शाहीनने आपल्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास दाखवला असून, पुढच्या सामन्यात दमदार पुनरागमन करण्याचा निर्धार त्याने बोलून दाखवला. या पराभवामुळे टीम खचलेली नसून पुढच्या मॅचसाठी सज्ज आहे, असे त्याने स्पष्ट केलं आहे. पण पाकिस्तानची पुढची मॅच कशी असते हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तान ही मालिका 3-0 ने गमावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : मॅच 50 ओव्हरची, पण 15 ओव्हरमध्येच पाकिस्तान 'खेळ खल्लास', कॅप्टन शाहीनने कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement