Iran War: ट्रम्प यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, भयंकर वार करणार इराण, ''थेट घरात घुसूनच...''
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Iran US Attack : इराणने आखाती देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर जोरदार हल्ले चढवले आहेत. त्यानंतर आता अमेरिकेने ज्याचा स्वप्नातही विचार केला नसेल असा वार इराण करणार असल्याचे वृत्त आहे.
वॉशिंग्टन: अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाला १२ दिवस झाले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुला खामेंनी यांच्या हत्येनंतरही इराणने जोरदार पलटवार केला आहे. दिवसेंदिवस संघर्ष तीव्र होत आहे. इराणच्या जोरदार प्रतिकारामुळे अमेरिका आणि इस्रायलही हैराण झाले आहेत. इराणने आखाती देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर जोरदार हल्ले चढवले आहेत. त्यानंतर आता अमेरिकेने ज्याचा स्वप्नातही विचार केला नसेल असा वार इराण करणार असल्याचे वृत्त आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता एका धोकादायक वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेची सर्वोच्च गुप्तचर संस्था FBI (Federal Bureau of Investigation) ने कॅलिफोर्निया पोलीस विभागाला एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. इराणकडून अमेरिकेच्या 'वेस्ट कोस्ट'वर (पश्चिम किनारपट्टी) हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अज्ञात जहाजातून ड्रोन हल्ल्याचा कट?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण अमेरिकेच्या किनारपट्टीजवळ एखाद्या अज्ञात जहाजाचा (Unknown Vessel) वापर करून अचानक ड्रोन हल्ला करण्याची शक्यता आहे. हे जहाज समुद्रात लपवून तिथून ड्रोन्सद्वारे कॅलिफोर्नियातील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले जाऊ शकते. 'लॉस एंजेलिस टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा हल्ला रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
advertisement
ट्रम्प यांची भूमिका आणि सुरक्षा यंत्रणांचा दावा
एककीडे FBI ने हा इशारा दिला असताना, दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या इशाऱ्याकडे कानाडोळा केला आहे. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, "इराण अमेरिकन भूमीवर हल्ला करण्याची हिंमत करेल, याची मला अजिबात चिंता वाटत नाही."
दरम्यान, इराणने याआधीच अमेरिकेला धडा शिकवण्याची धमकी दिली होती. आता ही धमकी केवळ आखाती देशांपुरती मर्यादित न राहता थेट अमेरिकेच्या मुख्य भूमीपर्यंत पोहोचली आहे. जर इराणने असा धाडसी प्रयत्न केला, तर तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 1:36 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran War: ट्रम्प यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, भयंकर वार करणार इराण, ''थेट घरात घुसूनच...''









