YouTubeवर 1 Million व्ह्यूज आल्यावर छप्परफाड कमाई होते? पाहा कसं आहे गणित
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
YouTube Earning: तुमचं चॅनल थोडं जुनं असेल आणि एखाद्या व्हिडिओवर 10 लाख व्ह्यूज आले तर तुमच्या खिशात लाखो रुपये येऊ शकतात. यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून कमाईची शानदार संधी देते.
advertisement
advertisement
दहा लाख व्ह्यूज मिळाल्यानंतर एखादा क्रिएटर किती पैसे कमवेल? : तुमच्या एका व्हिडिओला दहा लाख व्ह्यूज मिळाले तर तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. खरं तर, YouTube व्हिडिओचे स्वरूप, कॅटेगिरी आणि प्रेक्षक स्थान यासारख्या घटकांवर आधारित क्रिएटर्सना रेवेन्यू वाटप करते. या वर्षी, क्रिएटर्स प्रत्येक 1,000 व्ह्यूजसाठी 50-200 रुपये कमवत आहेत. साधारणपणे, तुम्ही प्रत्येक 10,000 व्ह्यूजसाठी 500-2,000 रुपये आणि प्रत्येक एक लाख व्ह्यूजसाठी 5,000-20,000 रुपये कमवू शकता. जर तुमचे चॅनल स्टेबलिश्ड असेल आणि तुम्ही एक अनुभवी क्रिएटर असाल, तर तुम्ही प्रत्येक एक मिलियन व्ह्यूजसाठी 2 लाख रुपये कमवू शकता.
advertisement
advertisement
तुमची कमाई कशी वाढवायची? : YouTube वर वाढण्यासाठी, तुमच्या व्हिडिओंच्या संख्येपेक्षा त्यांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा. ट्रेंडिंग विषयांवर व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या व्हिडिओंद्वारे शक्य तितक्या जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तुमचे व्हिडिओ अमेरिका आणि यूके सारख्या देशांमध्ये पाहिले गेले तर तुमची कमाई देखील वाढेल.







