Astrology 2026: शनी अस्ताला गेला की या राशींचे हाल! 13 मार्चपासून पुढे 35 दिवस अलर्ट मोडवर राहा, अन्यथा..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाच्या स्थितीला फार महत्त्व आहे. सध्या शनिचे राशीपरिवर्तन होणार नसले तरी त्याच्या स्थितीत बदल होणार आहे. शनिला कर्माचा आणि न्यायाचा देवता मानले जाते. शनी आपली स्थिती बदलतो किंवा अस्त होतात, तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो.
सध्याच्या ज्योतिषीय गणनेनुसार, 13 मार्च 2026 रोजी शनि मीन राशीत अस्त होणार असून तो सुमारे 35 दिवस म्हणजेच 17 एप्रिल 2026 पर्यंत याच अवस्थेत राहील. या काळात काही राशींना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, शनी स्वामी असलेल्या राशीच्या लोकांनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे. शनीच्या अस्ताचा या तीन राशींवर होणारा परिणाम थोडक्यात समजून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ - कुंभ राशीचा स्वामी देखील शनि असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ परीक्षेचा असू शकतो. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणतेही निर्णय घाईत घेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. या काळात तुमचा स्वभाव थोडा चिडचिडा किंवा कठोर होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक नात्यावर होईल.
advertisement
कुंभ राशीच्या लोकांनी पैशांच्या बाबतीत केलेली थोडीशी निष्काळजी मोठी महागात पडू शकते. उपाय म्हणून काळ्या कुत्र्याला भाकरी किंवा बिस्किटे खायला दिल्यास शनीचा अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)







