advertisement

एका वाक्याच्या चिठ्ठीने उलगडलं 8 महिन्यापूर्वीचं हत्याकांड, नागपुरातील भयंकर प्रकार समोर

Last Updated:

चुरगळलेल्या चिठ्ठीवरील एका वाक्याच्या माध्यमातून पोलिसांनी तपास करत आठ महिन्यांपूर्वी घडलेलं हत्याकांड उघडकीस आणलं आहे.

nagpur murder news (Ai Generated Photo)
nagpur murder news (Ai Generated Photo)
नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील 'टुरिस्ट' नावाच्या धाब्यावर आठ महिन्यांपूर्वी एक हत्येची घटना घडली होती. मात्र याबाबत कुणाला काहीच कल्पना नव्हती. याबाबत जेव्हा बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल झाला, तेव्हा पोलिसांकडे कसलाच पुरावा नव्हता. पोलिसांना केवळ एक चिठ्ठी सापडली होती. त्या चिठ्ठीवरील एका वाक्याच्या माध्यमातून पोलिसांनी तपास करत आठ महिन्यांपूर्वी घडलेलं हत्याकांड उघडकीस आणलं आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
प्रतापसिंह महादेवसिंह बैस असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो मूळचा मुंबईच्या विलेपार्ले येथील रहिवासी असून रामटेक येथील नवरगावच्या एका ढाब्यावर स्वयंपाकी म्हणून काम करत होता. मंगळवारी पोलिसांनी ढाब्याच्या मागील जमिनीतून त्यांचा सांगाडा बाहेर काढला असून, एका छोट्या चिठ्ठीमुळे या संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

आठ महिन्यांपूर्वी धाब्याचा मालक कैलास ठाकरे यांचा मुलगा पीयूष आणि प्रतापसिंह यांच्यात मोबाईल चोरीवरून वाद झाला होता. पीयूषने प्रतापसिंह यांच्यावर चोरीचा आळ घेतला होता. या वादातून चिडलेल्या पीयूषने प्रतापसिंह यांचा गळा आवळून खून केला आणि त्यांचा मृतदेह धाब्याच्या मागील बाजूस जमिनीत गाडून टाकला होता. प्रतापसिंह यांच्यासोबत काय घडलं? याची काहीच कल्पना कुणालाही नव्हती.
advertisement

खुनाचा उलगडा कसा झाला?

पोलिसांना तपासादरम्यान प्रतापसिंह यांनी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी चुरगळलेल्या अवस्थेत होती. त्यावर एकच वाक्य होतं. या वाक्याच्या आधारे पोलिसांनी तपास करत हे हत्याकांड उघडकीस आणलं. "मी कसलीही चोरी केलेली नाही..." असं वाक्य चिठ्ठीवर लिहिलं होतं. चिरगाळून टाकलेल्या या चिठ्ठीच्या अनुषंगाने तपास करत पोलीस आरोपी पीयूषपर्यंत पोहोचले. त्यांनी पीयूषची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मंगळवारी पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरून पुरावे गोळा करत प्रतापसिंह यांचा सांगाडाही जमीनीतून बाहेर काढला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एका वाक्याच्या चिठ्ठीने उलगडलं 8 महिन्यापूर्वीचं हत्याकांड, नागपुरातील भयंकर प्रकार समोर
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement