advertisement

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायचा प्लॅन? आता 'नो टेन्शन', मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबईतून 176 विशेष गाड्या, पाहा वेळापत्रक

Last Updated:

आता गावी जाणाऱ्या चाकरमानी आणि पर्यकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेतील प्रचंड गर्दीचा विचार करता, मध्य रेल्वेने १७६ विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वे विशेष गाड्या (प्रतिकात्मक फोटो)
मध्य रेल्वे विशेष गाड्या (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण शहराकडून आपल्या गावी जाण्यासाठी निघतात. अशात आता गावी जाणाऱ्या चाकरमानी आणि पर्यकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेतील प्रचंड गर्दीचा विचार करता, मध्य रेल्वेने १७६ विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि पुण्यावरून या विशेष गाड्या सुटणार आहेत.
गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने खालील प्रमुख मार्गांवर विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत:
सीएसएमटी ते गोरखपूर: ४४ फेऱ्या
एलटीटी ते दानापूर: ४४ फेऱ्या
पुणे ते गोरखपूर: ४४ फेऱ्या
पुणे ते दानापूर: ४४ फेऱ्या
या गाड्यांचे थांबे दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, भुसावळ, इटारसी आणि जबलपूरसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर असतील. प्रवाशांनी आपल्या सोयीनुसार अधिकृत IRCTC संकेतस्थळावर जाऊन वेळापत्रक तपासावे.
advertisement
12 मार्चच्या रात्री आरक्षण सेवा बंद
दरम्यान, तांत्रिक कारणांमुळे (डिस्क डीफ्रॅगमेंटेशन) मुंबईतील प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) १२ मार्चच्या रात्री ११.४५ ते पहाटे ३.१५ या कालावधीत बंद राहणार आहे. यादरम्यान तिकीट आरक्षण, चार्टिंग आणि परताव्याच्या सेवा उपलब्ध नसतील. त्यामुळे प्रवाशांनी आपली तिकीट बुकिंगची कामे या वेळेपूर्वी किंवा नंतर पूर्ण करावीत.
बेस्टच्या 'स्मार्ट मीटर'ला विरोध
दुसरीकडे, मुंबईत बेस्टकडून बसवण्यात येणाऱ्या प्रीपेड स्मार्ट वीजमीटरला राजकीय वर्तुळातून जोरदार विरोध होत आहे. प्रीपेड सेवेमुळे ग्राहकांचे नुकसान होईल, असा दावा करत शिवसेना (उबाठा) आणि भाजपच्या सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत तीव्र आक्षेप नोंदवला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायचा प्लॅन? आता 'नो टेन्शन', मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबईतून 176 विशेष गाड्या, पाहा वेळापत्रक
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement