गुरूच्या घरात एकत्र येणार बुध-शनी, 4 राशींच्या व्यक्तीचं घर भरणार सुखांनी, एप्रिल महिना भरभराटीचा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रहांचा वेळोवेळी राशीप्रवेश होतो, नक्षत्रप्रवेशही होतो. जेव्हा 2 ग्रह एकाच राशीत किंवा नक्षत्रात येतात तेव्हा त्यांची युती झाली, असं म्हणतात. आता लवकरच गुरू ग्रहाच्या नक्षत्रात शनी आणि बुध ग्रहांची युती होणार आहे. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशिष्ट महत्त्व आहे. शनीला म्हणतात 'न्यायदेवता', कारण हा ग्रह प्रत्येक व्यक्तीच्या पाप-पुण्याचा हिशेब करून त्यानुसार चांगलं, वाईट फळ देतो. तर, बुध ग्रहाला ज्ञान, व्यापार आणि संवादाचा कारक मानलं जातं. तसंच गुरू हा सर्वात पवित्र ग्रह मानला जातो. आता गुरूच्या घरात शनी आणि बुध ग्रह मिळून 4 राशींच्या व्यक्तींचं नशीब पार उजळवून टाकणार आहेत. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
advertisement
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, शनी आणि बुध ग्रह मिळून वृषभ राशीच्या व्यक्तींचं नशीब चमकवणार आहेत. त्यांना करियरमध्ये भरभरून लाभ मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे, सोबतच पगारवाढही होऊ शकते. त्याचबरोबर आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या अडचणी आता संपतील.
advertisement
advertisement
advertisement
शनी आणि बुध ग्रहांच्या युतीचा सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यावर पडेल. या राशीच्या व्यक्ती जर नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना या काळात उत्तम मनासारखी संधी मिळेल. बऱ्याच काळापासून सुरू असलेलं एखादं महत्त्वाचं काम मार्गी लागेल. त्यात वडिलांकडून मोलाची साथ लाभेल. महत्त्वाचं म्हणजे घरात अत्यंत आनंदी वातावरण नांदेल. घरात शुभकार्य पार पडण्याची शक्यता आहे. तसंच उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील.
advertisement
देवघरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, शनी सध्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. 3 एप्रिल रोजी याच नक्षत्रात बुध ग्रहाचाही प्रवेश होईल. त्यामुळे गुरू ग्रहाच्या या नक्षत्रात बुध आणि शनी ग्रहांची युती होईल. त्यानंतरचा काळ वरील 4 राशींच्या व्यक्तींसाठी भरभराटीचा असेल, अशी माहिती ज्योतिषांनी दिली आहे.
advertisement