तुम्ही मुंग्या पळवून लावता? लोक आवडीनं खातात, लाल मुंग्यांची झणझणीत चटणी, RECIPE

Last Updated:
Red Ant Chutney: घरात मुंग्या झाल्या की आपल्याला टेंशनच येतं. या मुंग्यांना पळवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय शोधतो. तुम्हाला माहितीये का, आपल्या भारतात असाही एक भाग आहे, जिथं लोक चक्क स्वत: घरी मुंग्या घेऊन येतात आणि मुंग्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. विशेष म्हणजे घरी जर कोणी पाहुणे आले, तर त्यांच्यासाठी खास मुंग्यांचा बेत आखला जातो. 
1/5
झारखंडमधील काही समुदायांमध्ये लाल मुंग्यांची चटणी अत्यंत लोकप्रिय आहे. काहीजण ही चटणी घरीच बनवतात, तर काहीजण बाजारातून विकत आणतात. शिवाय खास चटणीसाठी बाजारात जिवंत लाल मुंग्याही मिळतात.

advertisement
2/5
मिळालेल्या माहितीनुसार, चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी मुंग्या गोळ्या करून त्यांना कडकडीत गरम पाण्यात उकळायचं. त्यामुळे त्या स्वच्छ होतात. मग मुंग्यांना व्यवस्थित धुवून आलं, लसूण, मिरची, कांदा आणि टोमॅटोसोबत बारीक वाटायचं.

3/5
हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक केलं तर चटणीला हवी तशी चव येत नाही. त्यामुळे ते स्वतः दगडावरच वाटायचं, असं इथले लोक सांगतात. वाटणात सर्वात शेवटी चवीनुसार मीठ आणि थोडं मोहरीचं तेल घालावं. अशाप्रकारे मुंग्यांची चटणी तयार होते.

4/5
आंबट-तिखट चवीची ही चटणी लोक आवडीनं खातात. विशेषत: हिवाळी आहारात तिचा प्रामुख्यानं समावेश केला जातो. कारण या चटणीमुळे शरीरात उब निर्माण होते. 

5/5
असं म्हणतात की, मुंग्यांपासून कोणताही पदार्थ बनवायचा असेल तरी सर्वात आधी मुंग्या व्यवस्थित धुवून घ्याव्या. नाहीतर त्यातली घाण पोटात गेली तर ती आरोग्यासाठी विषारी ठरू शकते. महत्त्वाचं म्हणजे कोणताही ना पदार्थ खाण्यापूर्वी त्याबाबत स्वत: तज्ज्ञांशी चर्चा करावी. प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती वेगवेगळी असल्यामुळे त्या पदार्थाचं पचन होईलच असं नाही. 

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement