VIDEO : तुमचं बेडरूम नाही मैदान आहे, वर्ल्ड कप विजयानंतर हार्दिक माहिकाच्या रोमान्सवर फॅन्स भडकले
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
हार्दिक पांड्या आणि माहिकाच्या मैदानावरील रोमान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून काही फॅन्स त्याच्यावर टीका करत आहेत.
Hardik Pandya Mahika Sharma : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर टीम इंडियाने 96 धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत टी20 वर्ल्ड कप 2026 वर नाव कोरले होते. टीम इंडियाच्या या विजयानंतर खेळाडूंनी मैदानात तुफान जल्लोष केला. अनेक खेळाडूंनी आपल्या आई वडील बायका मुलांसह मैदानात सेलीब्रेशन केलं.त्यातल्या त्यात हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंडसोबत सेलीब्रेशन करताना दिसला होता. विशेष म्हणजे हे सेलीब्रेशन करताना तो मैदानावर विचित्रच वागत होता, कधी तो मैदानावर माहिकाला किस्स करत होता, तर कधी मैदानावर माहिकासोबत झोपत होता. हार्दिकचे हे चाळे पाहून फॅन्स त्याला छपरी म्हणत आहेत आणि त्यासोबत हे मैदान आहे,तुझं बेडरूम नव्हे अशा आशयाचे कमेंट करत आहे. दरम्यान हार्दिक पांड्या आणि माहिकाच्या मैदानावरील रोमान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
खरं तर टीम इंडियाच्या विजयानंतर प्रत्येक खेळाडूने मैदानात भन्नाट जल्लोष केला. बुमराह त्याच्या मुलासह आई आणि बायको सोबत जल्लोष करताना दिसला होता.टीम इंडियाचा उप कर्मधार अक्षर पटेल देखील त्याचा मुलगा आणि बायकोसोबत सेलीब्रेशन करताना दिसला होता. तर हार्दिक पांड्या पाठीवर फ्लॅग घेऊन नाचताना दिसला होता. या दरम्यान त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा देखील त्याच्यासोबत उपस्थित होते.
advertisement
What the hell is Hardik Pandya doing here? 😭
Looks like he was just left alone on the ground to get intimate with Mehieka last night 😂 pic.twitter.com/iNYPQEPlD8
— Kusha Sharma (@Kushacritic) March 9, 2026
हार्दिक पांड्या संपूर्ण स्टेडिअममध्ये माहिका शर्माच्या खांद्यावर हात ठेवून फिरत होता. या दरम्यान माहिका शर्माने त्याला किस देखील केले होते. या दरम्यानचे फोटो देखील समोर आले होते. या दरम्यान एक वेळ अशी आली होती.ज्यावेळी हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा पोडीअवर बसले होते. त्यानंतर अचानक दोघेही पोडिअमवर झोपून गेले होते. विशेष म्हणजे ही घटना त्यावेळी घडली जेव्हा मैदानात आयसीसीचे अध्यक्ष जय शहा,देशाचे गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. यासह अनेक दिग्गज नेते आणि मान्यवर तिथे उपस्थित होते.
advertisement
दरम्यान हार्दिकच्या अशा वागण्यावर आता त्याच्यावर प्रचंड टीका होते. कारण एक युझर म्हणतो आहे की बीसीसीआयने त्याच्यासाठी एक प्रायवेट रूमची व्यवस्था करावी. तर दुसऱ्याने असं लिहलं की, कुणीतरी त्याला सांगा हे त्याचं बेडरूम नाही आहे. 10 मिनिट आणखी थांबला असता तर काही खरं नसतं असं दुसऱ्या युझरने म्हटलं आहे. तसेच त्यांना बेडरूममध्ये मोकळं सोडा अशा आशयाच्या कमेंट देखील अनेक युझर करत आहेत. या व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 5:09 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : तुमचं बेडरूम नाही मैदान आहे, वर्ल्ड कप विजयानंतर हार्दिक माहिकाच्या रोमान्सवर फॅन्स भडकले






