पेरू आतून पिकलेला आहे की सडलेला? नुसत्या नजरेनं ओळखू शकाल, ट्रिक एकदम सोपी!

Last Updated:
आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ प्रामुख्यानं देतात. विशेषत: हंगामी फळं खाण्यावर भर देणं फायद्याचं ठरतं. पेरू फळ बाजारात दिसलं रे दिसलं की खरेदी करावंसं वाटतं, कारण ते चवीला अतिशय भारी लागतं, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. (सूर्यकांत यादव, प्रतिनिधी)
1/5
पेरू आपण आवडीनं खरेदी करतो खरं, मात्र काहीवेळा ते बाहेरून सुरेख हिरवंगार दिसतं आणि आतून मात्र किडलेलं असतं. मग पेरू आतून चांगलं आहे की नाही, हे ओळखावं तरी कसं? यासाठी काही भन्नाट ट्रिक आहेत, पाहूया.

advertisement
2/5
आतून सडलेलं पेरू ओळखणं फार कठीण नाहीये. त्यासाठी पेरूचं बाहेरून व्यवस्थित निरिक्षण करणं आवश्यक असतं. जर पेरूवर लहान लहान छिद्र असतील, सडल्यासारखे डाग असतील किंवा पेरूचा रंग असमान असेल तर ते आतून सडलेलं असू शकतं. 

3/5
पेरू हलकं दाबून पाहावं. जर ते हाताला खूप मऊ लागलं आणि त्यातून विचित्र वास आला तर ते खरेदी करू नये. प्रामुख्यानं पावसाळ्यात पेरूमध्ये किडे होतात. 

4/5
ताज्या आणि खाण्यायोग्य पेरूचा संपूर्ण रंग एकसमान असतो. त्यातून हलका गोड सुगंध येतो. तर, आतून सडलेल्या पेरूतून बऱ्याचदा दुर्गंध येतो. कापल्यानंतर आत थेट किडे दिसतात किंवा काळे डाग पाहायला मिळतात. 

5/5
फळं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यामुळे ती विश्वसनीय ठिकाणाहूनच खरेदी करावी. पेरूच्या बाबतीत तर विशेष काळजी घ्यावी. कारण बऱ्याचदा पेरू बाहेरून अतिशय सुरेख आणि खाण्यायोग्य वाटतात, परंतु आत मात्र सडलेले असतात. त्यात किडेही असू शकतात. 

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement