PM Kisan Yojana : या तारखेला येणार PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता, त्यामुळे हे काम तातडीने करून घ्या, अन्यथा अडकतील पैसे
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
PM Kisan Yojana New Update : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM KISAN) ही भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे, ज्याचा उद्देश भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला 6000 रुपये जमा केले जातात.
मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM KISAN) ही भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे, ज्याचा उद्देश भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला 6000 रुपये जमा केले जातात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते.
19 वा हप्ता कधी येईल?
पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आला. केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात अंदाजे 20,000 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. आता या योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, पीएम किसानचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात वितरीत केला जाईल. मात्र, यासंदर्भात सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही.
advertisement
पीएम-किसान लाभार्थी स्थिती कशी तपासायची?
1) सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर पेजवरील लाभार्थी स्थिती पर्यायावर जा.
2) आता तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाका आणि सबमिट करा. आता तुम्ही तुमची लाभार्थी स्थिती तपासू शकता.
ई-केवायसी करणे आवश्यक
ऑक्टोबर महिन्यात पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मिळलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात 19 वा हप्ता दिला जाऊ शकतो. मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याचा लाभ घेता घेता येणार नाही.
advertisement
त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने ई-केवायसी करावी लागणार आहे. पीएम किसान लाभार्थ्यांना 19 व्या हप्त्याबद्दल माहितीसाठी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट देऊ शकता
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2024 10:21 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
PM Kisan Yojana : या तारखेला येणार PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता, त्यामुळे हे काम तातडीने करून घ्या, अन्यथा अडकतील पैसे