Ruchita Jamdar: 'मला घराबाहेर काढण्यासाठी तिने...', BBM6 मधून बाहेर येताच रुचिताचा संताप, केली तन्वी कोल्तेची पोलखोल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6: घराबाहेर येताच रुचिताने घरातील स्पर्धकांची पोलखोल करायला सुरुवात केली आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने तन्वी कोल्तेच्या गेमबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
भाषेवरून स्पष्टीकरण देताना रुचिता म्हणाली, "ही खूप सामान्य भाषा आहे. गावाकडे असंच बोललं जातं. मराठी सिनेमांमध्ये हे शब्द वापरले आहेत. असे खूप लोक आहेत, ज्यांनी शिव्या दिल्या आहेत. आई-वडिलांवरून शिव्या दिल्या आहेत. चारित्र्यावरून बोलले आहेत. खूप घाण बोलले आहेत. राखी बोलली आहे, पण ती बोलली म्हणून गमतीने घेतलं आणि मी बोलले तर वेगळ्या अँगलने घेतलं."
advertisement
advertisement
advertisement
तन्वीची पोलखोल करत ती म्हणाली, "शोमध्ये सगळ्यांना माहीत होतं की मला स्मोकिंगचा त्रास आहे. मला तो वास सहन होत नाही. तन्वी प्रत्येक भांडणाआधी स्मोक करून यायची आणि माझ्या तोंडासमोर येऊन बोलायची, जे मला सहन होत नव्हतं. कदाचित तिने हे मुद्दाम केलं असेल, जेणेकरून मी तिला धक्का देईन. म्हणून मी तिला त्यावेळी खरकटी म्हणाले होते. मला तो वास येत होता."
advertisement






