advertisement

पत्नीला विचारल्याशिवाय कधीही करू नका 'हे' एक काम, तुमची ही चूक करेल कायमचं कंगाल!

Last Updated:

पत्नीला घराची 'लक्ष्मी' आणि पतीची 'अर्धांगिनी' म्हटले जाते. शास्त्रानुसार, काही कामे अशी आहेत जी पत्नीला विचारल्याशिवाय किंवा तिच्या संमतीशिवाय केल्यास त्याचे शुभ फळ मिळत नाही.

News18
News18
Wife Advice : हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नी हे एकमेकांचे पूरक मानले जातात. पत्नीला घराची 'लक्ष्मी' आणि पतीची 'अर्धांगिनी' म्हटले जाते. शास्त्रानुसार, काही कामे अशी आहेत जी पत्नीला विचारल्याशिवाय किंवा तिच्या संमतीशिवाय केल्यास त्याचे शुभ फळ मिळत नाही, उलट घराची बरकत कमी होऊ शकते. अर्धांगिनी म्हणजेच पतीच्या जीवनाचा अर्धा भाग, काही काम करण्यापूर्वी पत्नीचा सल्ला घेणे आवश्यक मानले जाते. ते काम कोणत, आणि ते करण्यापूर्वी पत्नीला का विचारावं? जाणून घेऊ.
पत्नीला न विचारता दान का करू नये?
हिंदू धर्मग्रंथांमध्ये दान हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. तथापि, पति-धर्मानुसार, दान करण्यापूर्वी पत्नीचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पत्नीचा पतीच्या संपत्तीवर आणि अन्नावर समान अधिकार आहे. घरातील लक्ष्मीच्या इच्छेविरुद्ध केलेले दान पूर्णपणे फलदायी नसते. हिंदू धर्मानुसार, पती जे काही धन कमावतो, त्यावर त्याच्या पत्नीचा अर्धा अधिकार असतो. जेव्हा तुम्ही कोणाला काही दान देता, तेव्हा तुम्ही केवळ तुमचेच नाही तर पत्नीच्या हिश्श्याचे देखील दान करत असता. त्यामुळे तिची संमती असणे नैतिक आणि धार्मिकदृष्ट्या अनिवार्य मानले जाते.
advertisement
तुमच्या एका चुकीमुळे होईल आर्थिक नुकसान
कोणत्याही धार्मिक विधीमध्ये पतीला तेव्हाच पूर्ण फळ मिळते जेव्हा पत्नी त्याच्या उजव्या बाजूला बसलेली असते. पत्नीच्या संमतीने केलेल्या दानामुळे 'शिव-शक्ती' या दोन्ही लहरी सक्रिय होतात, ज्यामुळे दानाचे पुण्य अनेक पटींनी वाढते. घराची पत्नी ही साक्षात लक्ष्मीचे रूप मानली जाते. जर तुम्ही तिला डावलून घराबाहेर धन वाटत असाल, तर ते घराच्या लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे आहे. यामुळे रुष्ट होऊन माता लक्ष्मी घराकडे पाठ फिरवू शकते आणि आर्थिक तणचण निर्माण होऊ शकते.
advertisement
सुदामा आणि श्रीकृष्ण कथा
पौराणिक कथेनुसार, जेव्हा सुदामा भगवान श्रीकृष्णांना भेटायला गेले, तेव्हा त्यांच्या पत्नीने दिलेले पोहे हे सुदामाने प्रेमाने स्वीकारले. जेव्हा श्रीकृष्ण सुदामाला तिसरी मूठ पोहे भरून पूर्ण ऐश्वर्य देणार होते, तेव्हा माता रुक्मिणीने त्यांचा हात धरला. याचे एक कारण असेही मानले जाते की, कुटुंबाच्या संमतीशिवाय किंवा मर्यादेबाहेर दिलेले दान संकटात टाकू शकते. तात्पर्य असं, की जर पती पत्नीला न सांगता गुप्तपणे किंवा तिला विश्वासात न घेता दान करत असेल, तर भविष्यात त्यावरून घरात वाद निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात पती-पत्नीमध्ये अन्नावरून किंवा धनावरून वाद होतात, तिथे सकारात्मक ऊर्जा टिकत नाही आणि दारिद्र्य येते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
पत्नीला विचारल्याशिवाय कधीही करू नका 'हे' एक काम, तुमची ही चूक करेल कायमचं कंगाल!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement