advertisement

पिंपरीतील व्यापाऱ्याचे 50 लाखांसाठी अपहरण, 100 किमी पाठलाग करून आरोपीला सिनेस्टाईल पकडलं

Last Updated:

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने संगमनेर येथे तब्बल 100 किलोमीटर पाठलाग करून पाच आरोपींना अटक करत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे.

पाच आरोपींना अटक
पाच आरोपींना अटक
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील एका व्यापाऱ्याचे ५० लाख रुपयांसाठी अपहरण करण्यात आले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तब्बल १०० किलोमीटर पाठलाग करून आरोपीला बेड्या ठोकल्या.
याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने संगमनेर येथे तब्बल 100 किलोमीटर पाठलाग करून पाच आरोपींना अटक करत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे. 9 मार्च रोजी सायंकाळी 5:15 च्या सुमारास राहटणी येथील शिवराज नगर येथून हॉटेलच्या बाहेरून एका चार चाकी वाहनातून सुरेशकुमार बाबूमल जयस्वानी या 47 वर्षीय व्यावसायिकाचा अपहरण करण्यात आलं होतं.
advertisement
याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात पाच अनोळखी व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत या पाचही जणांना ताब्यात घेतले आहे.
हे पाचही आरोपी मूळचे बिहारमधील असून अपहरण करण्याकरिता ते पिंपरी चिंचवड शहरात आले असल्याची माहिती समोर आली. या अपहरणाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे.
advertisement

तक्रारीत काय म्हटलंय?

दि.०९/०३/२०२६ रोजी १७.१५ वाजताच्या सुमारास शिवराजनगर येथील बंद अवस्थेतील फाऊंटन हॉटेलचे समोरील लेनमध्ये रहाटणी पुणे येथून सुरेशकुमार बाबुमल जैसवानी यांच्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट कार नं. युपी. ७०.९२७२ मधून खंडणीकरीता जबरदस्तीने अपहरण करुन त्यानंतर भाऊ सुरेशकुमार याचेच मोबाईल नंबर xxx वरुन फोन करुन ५० लाख रुपयांची खंडणी मागणी करुन ५० लाख रुपये खंडणी दिली नाही तर सुरेशकुमार यास जीवे ठार मारू असे म्हणाले. स्विफ्ट कारमधील अनोळखी ५ इसमांविरुध्द कायदेशीर फिर्याद व्यापाऱ्याच्या भावाने दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पिंपरीतील व्यापाऱ्याचे 50 लाखांसाठी अपहरण, 100 किमी पाठलाग करून आरोपीला सिनेस्टाईल पकडलं
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement