घरात चुकूनही लावू नका यमाच्या दिशेत घड्याळ, मरणाचे होतील वाद, अजिबात होणार नाही भरभराट!

Last Updated:
वास्तूशास्त्र सांगतं की, आपल्या आजूबाजूच्या वस्तूंचा, दिशांचा, रंगांचा प्रभाव कळत, नकळतपणे आपल्या आयुष्यावर पडत असतो. त्यावर आपलं सुख, दु:ख अवलंबून असतं. अगदी आपल्या घरातील घड्याळ जसं वेळ दर्शवतं तशी आपली वेळ बदलूही शकतं. त्यामुळे ते कायम योग्य दिशेतच असायला हवं. ही योग्य दिशा नेमकी कोणती, जाणून घेऊया. (गुलशन कश्यप, प्रतिनिधी)
1/5
वास्तूशास्त्रानुसार प्रत्येक दिशेला विशिष्ट महत्त्व आहे. त्यामुळे ठराविक वस्तू ठराविक दिशेत असेल तर त्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे या जागेत जर घड्याळ लावलं तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर पडू शकतो. यामुळे घरात वाद होऊ शकतात, आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते, असं ज्योतिषी सांगतात. जर दक्षिण दिशेशिवाय काही पर्यायच नसेल तर घड्याळ आग्नेय दिशेत लावण्याचा सल्ला दिला जातो.

advertisement
2/5
ज्योतिषांनी सांगितलं की, घराचं बेडरूम किंवा किचनच्या नैऋत्य दिशेत कधीच घड्यात लावू नये. कारण बेडरूममध्ये घड्याळ लावण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा योग्य मानली जाते. तर, नैऋत्य दिशेत घड्याळ लावल्यानं घरात आजारपण येण्याची शक्यता असते. जर किचनमध्ये या दिशेत घड्याळ असेल तर घरातील शांतता भंग होऊ शकते. 

3/5
पूर्व दिशा ही सूर्याची दिशा मानली जाते. सूर्याला म्हणतात 'ग्रहांचा राजा', त्यामुळे त्याची दिशा सकारात्मकतेचं प्रतीक असते. ज्योतिषी सांगतात की, या दिशेत घड्याळ असल्यामुळे घरातील व्यक्ती उत्साही राहतात. त्यांची मानसिक स्थिती उत्तम राहते. तसंच सकारात्मकतेमुळे घराची सर्वांगीण भरभराट होते. 

4/5
आपण घराच्या पश्चिम दिशेतील भिंतीवरही घड्याळ लावू शकता, परंतु घड्याळ बंद पाडून ठेवू नये. पश्चिम ही मेहनत आणि स्थिरतेची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेतील भिंतीवर घड्याळ लावल्यानं आपली कार्यक्षमता वाढते, असं म्हणतात. परंतु जर घड्याळ बंद पडलं असेल, तर त्यामुळे आपल्या कामात अडथळे येण्याची शक्यता निर्माण होते. 

5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement