Bajaj ने टाकला मोठा डाव, आणतेय 137 किमी चालणारी मजबूत स्कूटर!
- Published by:sachin Salve
Last Updated:
नव्याने इलेक्ट्रिक टू व्हीलर घेणार असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. बजाज चेतकच्या इलेक्ट्रिक स्कूटरचं नवीन व्हर्जन लवकरच बाजारात सादर होणार आहे.
मुंबई : सध्याचा काळ इलेक्ट्रिक वाहनांचा आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर आणि एकंदरीतच सारे खर्च पाहता गेल्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा खप वाढला आहे. अनेक छोट्या शहरांमध्येही रस्त्यावर इलेक्ट्रिक टू व्हीलर्स अगदी सहज दिसू लागल्या आहेत. टू व्हीलर ही जवळपास प्रत्येक घराची मूलभूत गरज बनली आहे. घरातल्या प्रत्येक सदस्याला त्याचं काम कोणतंही असलं, तरी टू व्हीलरची मदत होते. इलेक्ट्रिक टू व्हीलरमुळे खर्च कमी व्हायला मदत होते. नव्याने इलेक्ट्रिक टू व्हीलर घेणार असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. बजाज चेतकच्या इलेक्ट्रिक स्कूटरचं नवीन व्हर्जन लवकरच बाजारात सादर होणार आहे.
बजाज कंपनीच्या चेतक या स्कूटरने एक काळ अक्षरशः गाजवला आहे. स्कूटर म्हटलं की चेतक एवढंच समीकरण होतं. काळानुसार झालेल्या बदलानुसार बजाजने 2020 साली चेतकचं इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात आणलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता नवीन लूक्स आणि खास फीचर्ससह चेतकचं नवं मॉडेल सादर होणार आहे. 20 डिसेंबर रोजी ते बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या स्कूटरच्या फीचर्सबद्दल माहिती घेऊ या.
advertisement
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने सिंगल पीस सीट देण्यात आली आहे. तसंच, खराब आणि खड्डे असलेल्या रस्त्यांवर रायडरला झटके लागू नयेत म्हणून हेवी सस्पेंशन पॉवरदेखील या स्कूटरला देण्यात आली आहे. असं सांगण्यात येत आहे, की यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने डिस्क ब्रेक देण्यात येतील. या स्कूटरला स्टायलिश एलईडी लाइट्स आहेत. ही स्कूटर हाय पिकअप जनरेट करण्याची अपेक्षा आहे.
advertisement
बजाज इलेक्ट्रिक स्कूटरच्या सध्या बाजारात असलेल्या मॉडेलची किमान किंमत 96 हजार रुपये एवढी आहे. तसंच, टॉप मॉडेलची किंमत 1.29 लाख रुपये आहे. नव्या मॉडेलची किंमत किती असेल आणि तिची डिलिव्हरी कधीपासून सुरू होईल, याबद्दल कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही; मात्र नव्या मॉडेलची प्रारंभिक किंमत एक लाख रुपये असेल असा अंदाज आहे.
advertisement
ही स्कूटर वेगवेगळ्या बॅटरी पॅक्समध्ये उपलब्ध असेल. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर बॅटरीच्या क्षमतेनुसार ही स्कूटर 123 ते 137 किलोमीटर्सची रेंज देते. या स्कूटरला ड्युएल कलर ऑप्शनदेखील उपलब्ध असेल.
सध्या बाजारात एथर रिझ्ता, ओला एस वन आणि टीव्हीएस आयक्यूब या इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध असून, त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बजाजची नवी चेतक इलेक्ट्रिक स्कूटर या सर्वांशी स्पर्धा करील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2024 11:17 PM IST