Farmer Award : बळीराजाचा देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होणार, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग कृषी रत्न पुरस्काराची घोषणा, पुरस्कारासाठी नोंदणी सुरू
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Prime Minister Chaudhary Charan Singh Krishi Ratna Award : कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचाही कृषीरत्न, सेवारत्न आणि कलारत्न या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या स्मरणार्थ किसान ट्रस्ट या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेतर्फे हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
मुंबई : देशात एखाद्या व्यक्तीने कोणत्याही क्षेत्रात असामान्य कार्य आणि सर्वोच्च सेवा केली की त्यांना भारत सरकारकडून भारतरत्न पुरस्कार दिला जातो. त्याच धर्तीवर आता कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचाही कृषीरत्न, सेवारत्न आणि कलारत्न या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या स्मरणार्थ किसान ट्रस्ट या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेतर्फे हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू करण्यात येत असल्याचे किसान ट्रस्टच्या सदस्यांनी सांगितले. कृषीरत्न, सेवारत्न आणि कलारत्न या तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. यानुसार कृषी क्षेत्रात दोन पुरस्कार दिले जाणार आहेत. यापैकी एक पुरस्कार शेतीमध्ये विशेष काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि दुसरा पुरस्कार कोणत्याही कृषी शास्त्रज्ञ किंवा संस्थेला देण्यात येणार आहे.
advertisement
द्वितीय श्रेणीतील पुरस्कार कोणाला मिळणार?
दुसऱ्या श्रेणीमध्ये सामाजिक न्याय आणि समाजकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विशिष्ट व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार देण्यात येईल. तर, तिसऱ्या श्रेणीत, हा पुरस्कार पत्रकारिता आणि जनहितासाठी आपल्या लेखन, छायाचित्रण किंवा 'व्हिडिओ डॉक्युमेंटरी'द्वारे आवाज उठवणाऱ्या विशेष व्यक्तीला दिला जाईल.
दरवर्षी पुरस्काराचे आयोजन केले जाणार
किसान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. यशवीर सिंग म्हणाले की, चौधरी चरणसिंग यांच्या जयंती (23 डिसेंबर) निमित्त दरवर्षी डिसेंबर महिन्यात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी 21 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कामाची माहिती लोकांना देणे हा या पुरस्कारांचा उद्देश आहे. या पुरस्कारांसाठी नामांकनाची अंतिम तारीख 10 डिसेंबर आहे, त्यासाठी नामांकन किसान ट्रस्टला ई-मेल आणि पत्राद्वारे पाठवता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2024 9:21 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Award : बळीराजाचा देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होणार, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग कृषी रत्न पुरस्काराची घोषणा, पुरस्कारासाठी नोंदणी सुरू