नवरात्रीतही उन्हाचे चटके, विदर्भातील जनता उकाड्याने हैराण
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नवरात्र सुरू होऊनही विदर्भात गुलाबी थंडी नाही तर कडक उन्हाचे चटकेच बसत आहेत. पाहा कधी घटणार तापमान?
देशभरात सर्वत्र नवरात्र उत्सवाची सांगता झाली असतांना अद्याप उन्हाच्या झळा काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. निम्म्याहून अधिक ऑक्टोबर महिना निघून गेला असला तरी हिवाळ्याची चाहूल लागलेली नाही. मान्सूनने देशभरातून काढता पाय घेतला असताना राज्याच्या सर्वच जिल्हातील तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे ऑक्टोबर हिटच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत.
advertisement
येत्या काळातही तापमान वाढ आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. उन्हासोबत वातावरणात आर्द्रतेच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या झळा उन्हाळ्या इतक्याच असह्य असल्याने नागरिकांना मनस्थाप सहन करावा लागतो आहे.
advertisement
हवामानात झालेल्या या बदलामुळे सध्या हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे. येत्या काही आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
advertisement
advertisement
तरी विदर्भातील चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून वातावरणात उष्म असल्याने आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. विदर्भात आणखी काही दिवस ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
advertisement
नागपूरच नाही तर हा परिणाम संपूर्ण विदर्भात दिसून येत आहे. विदर्भाला देखील या उष्म्याने घाम फोडला आहे. नागपूर जिल्ह्यातील तापमान 35.9 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ अकोला 37.0 अंश सेल्सिअस वर आहे. तापमान अचानक वाढले तर वातावरणात उष्मा वाढल्याने चांगलाच उकाडा निर्माण झाला आहे.
advertisement
नागपूर शहरात आज कमाल 35.9 तर किमान तापमान 20.1, गोंदिया कमाल 34.4 तर किमान 20.6, गडचिरोली कमाल 34.4 तर किमान 19.8, चंद्रपूर कमाल 34.4तर किमान 21.0, यवतमाळ कमाल 35.7 तर किमान 19.2, वाशिम कमाल 36.2 तर किमान 18.4, बुलढाणा कमाल 34.4 तर किमान 20.4, अमरावती कमाल 35.8 तर किमान 20.5 अंश सेल्सिअस आहे. वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान 35.0 तर किमान तापमान 21.5 अंश सेल्सिअस आहे.