Salary Tips: 10000000 रुपयांचं घर घेण्यासाठी मिनिमम सॅलरी किती असायला हवी?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Home Loan: बातमी तुमच्या कामाची! किती पगार असेल तर तुम्हाला 1 कोटीचं घर घेता येईल? एक्सपर्टने थेट सांगितलं, कोणते चार मॅजिक रुल्स आहे जे प्रत्येकाला माहिती हवेत, नाहीतर तुमची ओढाताण होऊ शकते. हे सगळं समजून घ्या.
 महागाईच्या या काळात स्वतःचं घर असायला हवं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आज जेव्हा रिअल इस्टेटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, तेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे पैसे कसे कुठे किती द्यायचे, पगार किती असेल तर किती लोन मिळणार, EMI किती बसणार, आज प्रॉपर्टीच्या किंमती तर सोन्यापेक्षाही महाग होत चालल्या आहेत. जर तुम्हाला १ कोटी रुपयांचे घर खरेदी करायचे असेल, तर तुमचा पगार नेमका किती असावा? याबाबत एक्सपर्टकडून जाणून घेणार आहोत.
advertisement
 गुंतवणूकदार बँकर आणि बिझनेस एज्युकेटर सार्थक अहूजा यांनी दिले आहे. त्यांनी चार असे 'गोल्डन फायनान्शियल रूल्स' सांगितले आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार किती किमतीचे घर घेऊ शकता, याचा अचूक निर्णय घेता येईल. सार्थक अहूजा स्पष्ट करतात की, घर खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला तुमची एकूण मिळकत, कर्ज घेण्याची क्षमता आणि EMI याचं योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
advertisement
advertisement
advertisement
 उरलेल्या रकमेसाठी कर्ज घेतले जाऊ शकते, परंतु कर्जाची रक्कम घराच्या एकूण किमतीच्या ६५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम मासिक हप्त्याच्या (EMI) व्यवस्थापनावर आधारित आहे. जर तुमचा इन-हँड पगार १.६ लाख रुपये असेल, तर तुमचा मासिक हप्ता जास्तीत जास्त ५५ ते ६० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावा.
advertisement
advertisement
 शेवटचा नियम कर्जाच्या कालावधीबद्दल आहे. अहूजा यांच्या मते, कर्जाचा कालावधी जास्त असल्यास, तुम्हाला व्याजाच्या रूपात खूप मोठी रक्कम बँकेला परत करावी लागते. त्यामुळे, शक्य असल्यास तुमचे गृहकर्ज २० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत संपवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही लवकर कर्जमुक्त व्हाल आणि व्याजावर होणारा अवाजवी खर्च टाळता येईल. या चार नियमांचे पालन केल्यास तुम्ही सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासाने घर खरेदी करू शकता.


