Ram Navami 2024: राम आएंगे..! रामनवमीच्या दिवशी हे 5 उपाय घरात सुख-समृद्धी-संपत्ती वाढवतील
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ram Navami 2024: बुधवार 17 एप्रिल रोजी देशभरात रामनवमी उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्रेतायुगात चैत्र शुक्ल नवमीला दशरथाचा पुत्र म्हणून श्री रामाचा जन्म झाला. फक्त भारतातच नाही तर शेजारील देश नेपाळ आणि श्रीलंका येथेही रामनवमीचा सण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने साजरा केला जातो. श्रीराम हा विष्णूचा अवतार मानला जातो. म्हणून रामनवमीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यानं सीतेच्या रूपातील लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करते, आपले घर सुख-समृद्धीने भरते. जाणून घेऊया कोणते आहेत हे खास उपाय.
advertisement
राम नवमीला अभिषेक कसा करावा -रामनवमीच्या दिवशी सकाळी स्नान करून घरातील देव्हारा गंगाजलाने शुद्ध करा. यानंतर रामाची मूर्ती लाकडी पाट/चौरंगावर स्थापित करा. त्यानंतर दक्षिणावर्ती शंख दुधाने आणि केशराने भरून रामाच्या मूर्तीला अभिषेक करावा. यामुळे अडकलेले पैसे परत मिळतील आणि आपल्या घरातील सुख-सुविधा वाढतील.
advertisement
रामनवमीला हा उपाय मनोकामना पूर्ण करेल -रामनवमीला श्री रामासोबत हनुमानाचीही पूजा करावी. घरी सुंदरकांड पठण करावं. असं केल्यानं आपल्याला रामाचा आशीर्वाद मिळेल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. रामनवमीच्या दिवशी हरभरा, केळी आणि इतर फळे माकडांना खायला द्या. यामुळे आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.
advertisement
रामनवमीला तुळशीचा उपाय - रामनवमीला तुळशीची पूजा करावी. संध्याकाळी प्रदोषकाळात तुळशीला दिवा लावून 3 वेळा प्रदक्षिणा घालावी. तुळशी भगवान विष्णूला सर्वात प्रिय असल्याचे सांगितले जाते आणि राम देखील विष्णूचा अवतार आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीचे उपाय केल्याने श्री राम प्रसन्न होतात. कुटुंबात एकता आणि समृद्धी वाढते.
advertisement