Weather Alert: ठाणे, कल्याण-डोंबिवलीत अचानक हवापालट, पुढील 24 तासांसाठी महत्त्वाचा अलर्ट
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत असून थंडीची तीव्रता कमी झाली आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून आता उन्हाळ्याची चाहुल लागल्याचे जाणवत आहे. सकाळी हलकासा गारवा टिकून असला, तरी दुपारी उन्हाचा चटका वाढत चालला आहे. पुढील काही दिवस राज्यभरात कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. शनिवारी असलेल्या तापमानाच्या तुलनेत रविवारपासून दिवसाच्या तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली परिसरातील 8 फेब्रुवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
गेल्या आठवड्यापासून कडक उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र असून आज कल्याण-डोंबिवलीत हवामान मुख्यत्वे कोरडे, उष्ण आणि स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. दिवसा कडक ऊन आणि आकाशात अंशतः ढग दिसू शकतात. त्यामुळे दुपारच्या वेळी थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे, आरोग्यासाठी भरपूर पाणी प्या.
advertisement
advertisement
बदलापूर शहरात आज हवामान सुखद आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस, किमान तापमान 34 अंश सेल्सिअस असेल. दिवसभर कडक ऊन असल्याने उकाडा जाणवेल. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान स्वच्छ आणि अंशतः ढगाळ असून, दिवसा ऊन राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस असेल. पहाटे हवामान सुखद आणि थंड, तर दुपारी उकाडा जाणवेल.








