kalwa Incident : भयंकर! सकाळची वेळ अन् चिमुकलीच्या घरच्यांसमोर समोर आलं भयंकर दृश्य; हृदय पिळवटून टाकणारी घटना
Last Updated:
Shocking Incident: शिळफाटा परिसरातील खान कंपाउंडमध्ये घडलेल्या एका घटनेने सर्वजण हादरुन गेलेले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
कळवा : शिळफाटा परिसरातील खान कंपाउंडमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुरड्या मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. कश्यप फाहेजान अहमद खान असे या चिमुकलीचे नाव असून ती कुटुंबासोबत खान कंपाउंड परिसरात राहत होती.
खेळता खेळता काळाचा घाला?
स्थानिक रहिवाशांना घराजवळील मोकळ्या जागेत असलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ मुलीचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर तात्काळ शिळफाटा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार
प्राथमिक माहितीनुसार, ही मुलगी घराजवळ खेळत असताना पाण्याच्या डबक्याजवळ गेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र तिचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे.
advertisement
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी पाणी साचून डबकी तयार होतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा डबक्यांमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शिळफाटा पोलिसांकडून सखोल तपास सुरू
शिळफाटा पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कोणताही संशयास्पद प्रकार आहे का याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान चिमुकलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 8:51 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
kalwa Incident : भयंकर! सकाळची वेळ अन् चिमुकलीच्या घरच्यांसमोर समोर आलं भयंकर दृश्य; हृदय पिळवटून टाकणारी घटना








