Netherlands vs Pakistan : 'पाकिस्तान मॅच जिंकली नाही तर...', नेदरलँडच्या खेळाडूने सर्वांसमोर काढली पाकड्यांची इज्जत! काय म्हणाला?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Netherlands vs Pakistan, T20 World Cup 2026 : पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाबद्दल बोलताना मीकरेन म्हणाला की, आम्ही त्यांच्यापेक्षा चांगला खेळ करत होतो आणि आम्हीच विजयाचे खरे मानकरी होतो.
Netherlands vs Pakistan : T20 वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानने विजयाचा श्रीगणेशा केला. रडत रडत का होईना पाकिस्तानने नेदरलँड्सवर 3 विकेट्स राखून थरारक विजय मिळवला आहे. 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अशरफने केवळ 11 बॉल्समध्ये 29 धावांची नाबाद खेळी केली आणि पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या विजयानंतर नेदरलँड्सचा बॉलर पॉल वैन मीकरेन याने संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानने ही मॅच जिंकली नसून आम्ही ती त्यांना गिफ्ट दिली, अशा शब्दांत मीकरेनने नाराजी व्यक्त केली.
आम्हीच विजयाचे खरे मानकरी
पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाबद्दल बोलताना मीकरेन म्हणाला की, आम्ही त्यांच्यापेक्षा चांगला खेळ करत होतो आणि आम्हीच विजयाचे खरे मानकरी होतो. आज आम्ही कदाचित पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवायला हवा होता, पण आम्ही स्वतःच्या चुकांमुळे ही संधी गमावली. हा पराभव आमच्यासाठी अत्यंत लाजिरवाणा असल्याचं देखील त्याने यावेळी म्हटलं. पण बोलता बोलता मीकरेन याने पाकिस्तानसारख्या मोठ्या टीमची इज्जत काढली आहे.
advertisement
वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याची शक्यता
दरम्यान, पाकिस्तानने या विजयामुळे वर्ल्ड कपचा प्रवास थोडक्यात वाचवलं असून, त्यांचा पुढचा सामना आता अमेरिकेसोबत होणार आहे. पाकिस्तान एका पराभवाने वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याची शक्यता आहे. अशरफने आपल्या खेळीत 3 सिक्स आणि 2 फोर मारत पाकिस्तानच्या आशा जिवंत ठेवल्या. नेदरलँड्सला विजयाने हुलकावणी दिल्याने आता त्यांना पुढच्या मॅचमध्ये जोरदार कमबॅक करावं लागणार आहे.
advertisement
कधीकधी क्रिकेट क्रुर खेळ
दरम्यान, नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स म्हणाला की, मॅचमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना चांगली बॉलिंग करावी लागेल. "आम्हाला वाटलं होतं की 160 धावा आम्हाला चांगली संधी देऊ शकतात. म्हणून आम्ही थोडे मागे होतो आणि सामन्यात टिकून राहण्यासाठी आम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागली. पाकिस्तानला हरवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले. पण कधीकधी क्रिकेट क्रुर खेळ असू शकतो, असंही नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने म्हटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 8:35 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Netherlands vs Pakistan : 'पाकिस्तान मॅच जिंकली नाही तर...', नेदरलँडच्या खेळाडूने सर्वांसमोर काढली पाकड्यांची इज्जत! काय म्हणाला?








