हॉस्टेलमधून घुसून सपासप वार, रशियात चार भारतीय विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Attack on Indian Student in Russia: रशियातील बश्कोर्तोस्तानची राजधानी असलेल्या उफा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये चार भारतीय विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
रशियातील बश्कोर्तोस्तानची राजधानी असलेल्या उफा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये चार भारतीय विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलाने हॉस्टेलमध्ये घुसून हा हल्ला केला. यात ४ भारतीय विद्यार्थ्यांसह इतर काहीजण जखमी झाले आहेत. भारतीय दूतावासने शनिवारी (७ फेब्रुवारी २०२६) रात्री या घटनेला दुजोरा दिला असून जखमींवर उपचार सुरू असल्याचं सांगितलं आहे.
भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर माहिती देताना म्हटले आहे की, "उफा येथे झालेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही रशियाच्या स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. कझान येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे अधिकारी तातडीने उफाकडे रवाना झाले असून, जखमी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल."
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (७ फेब्रुवारी) एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा उफा येथील स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या परिसरात शिरला. तो थेट विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात गेला आणि तिथे असलेल्या विद्यार्थ्यांवर त्याने अचानक चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. हल्ला इतका अनपेक्षित होता की विद्यार्थ्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.
advertisement
रशियाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांवरही चाकूने वार केले. अटक टाळण्यासाठी त्याने स्वतःलाही जखमी करून घेतले आहे. पण अथक प्रयत्नानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्ता मेजर जनरल इरीना वोल्क यांनी दिली.
जखमींची प्रकृती चिंताजनक
रशियाच्या आरोग्य मंत्रालयानुसार, या हल्ल्यात एकूण आठ जण जखमी झाले आहेत. यामध्ये चार भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर मुलगा देखील स्वतःला जखमी केल्यामुळे रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृतीही गंभीर आहे.
advertisement
नियो-नाझी संघटनेशी संबंध?
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या हल्ल्यामागे गंभीर कारण असण्याची शक्यता आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हा १५ वर्षीय आरोपी एका प्रतिबंधित नियो-नाझी (Neo-Nazi) संघटनेशी संबंधित होता. हल्ला करताना तो 'राष्ट्रवादी' घोषणा देत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर विद्यापीठ परिसर आणि हॉस्टेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Delhi
First Published :
Feb 08, 2026 8:52 AM IST








