advertisement

Ajit Pawar Death : अजितदादांचं घड्याळ सापडलंच नाही, मग मृतदेहाची ओळख कशी पटली? पोलिसांचा शॉकिंग खुलासा!

Last Updated:

Ajit Pawar Death Mystery : अजित पवार यांचा मृतदेह हा त्यांच्या हातातील घड्याळावरून ओळखू आला होता, अशी माहिती समोर आली होती. मात्र, या प्रकरणात वेगळंच तथ्य समोर आलं आहे.

Ajit Pawar plane Crash investigation
Ajit Pawar plane Crash investigation
Ajit Pawar plane Crash investigation : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. अजित पवार यांचं विमान अपघातात मृत्यू झाला होता. अशातच आता सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक बसवराज आणि सुधीर हिरेमठ यांनी अपघात घटनास्थळावर भेट दिली. या भेटीनंतर सीआयडीने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, यापूर्वी अजित पवारांच्या मृतदेहाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

अजित पवारांची मृतदेहाची ओळख घड्याळावरून नाही

अजित पवार यांचा मृतदेह हा त्यांच्या हातातील घड्याळावरून ओळखू आला होता, अशी माहिती समोर आली होती. मात्र, या प्रकरणात वेगळंच तथ्य समोर आलं आहे. वरिष्ठ पोलिसांकडून जेव्हा तपास सुरू केला गेला, तेव्हापासून अनेक धक्कादायक उलघडा होताना दिसतोय. अशातच अजित पवारांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून झाली नव्हती, अशी माहिती समोर येत आहेत.
advertisement

मग मृतदेहाची ओळख कशी पटली?

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख ही त्यांच्या कुर्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या एका विशिष्ट कापडामुळे पटली होती. त्यावर एक विशिष्ट डिझाईन देखील होती. त्यावरून मृतदेह अजितदादांचा होता, याची पोलिसांना शाश्वती मिळाली. तर त्यांच्या डाव्या हातावर काही भाग घड्याळासारखा दिसून आला होता, तो भाग घड्याळ नसून शर्टच्या एक भाग होता, अशी माहिती समोर आलीये. सकाळ वृत्त समुहाने याबाबत वृत्त दिलं आहे.
advertisement

DNA अहवालानंतर चित्र स्पष्ट

पोलिसांनी कपड्यांवरून सर्व मृतदेहांची प्राथमिक ओळख जरी पटवली असली तरी अखेर डीएनए चाचणी केल्यानंतरच मृतदेहाची नावं निश्चित करण्यात आली. DNA अहवालानंतरच मृतदेह सोपवण्यात आले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोणतीही चूक टाळण्यासाठी सर्व शास्त्रीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement

दशक्रिया विधी होणार नाही

दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दशक्रिया विधी होणार नाही, अशी माहिती अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Death : अजितदादांचं घड्याळ सापडलंच नाही, मग मृतदेहाची ओळख कशी पटली? पोलिसांचा शॉकिंग खुलासा!
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement