Bhide Bridge Update : पुण्यातील भिडे पूले दिवसा खुला ठेवण्याची मागणी; पालिका काय निर्णय घेणार?
Last Updated:
Bhide Bridge : पुण्याती भिडे पुलासंबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नक्की कोणती अपडेट समोर आली आहे त्या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात.
पुणे : पुणे शहरात राहणाऱ्या प्रत्येकासाठी भिडे पूल हा अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून भिडे पूल बंद असल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. त्यामुळे हा पूल दिवसा वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी होत आहे. त्यातही पादचारी पुलासाठी मेट्रोकडून सुरू असलेल्या कामाची मुदत संपली असली तरी पूल अजूनही पूर्णपणे बंदच आहे.
कोणत्या वेळेत पूल सूरु ठेवण्याची होत आहे मागणी?
पुणे शहरातील सजग नागरिक मंचने या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की मेट्रोचे काम दिवसा थांबवून भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करावा आणि पादचारी पुलाचे काम रात्रीच्या वेळी करावे. या मागणीसाठी मंचचे अध्यक्ष वितेक वेलणकर यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांना निवेदन दिले आहे.
advertisement
गणपती उत्सवादरम्यान मेट्रोचे काम 15 दिवस थांबवून भिडे पूल तात्पुरता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर 9 सप्टेंबरपासून पूल पुन्हा महिनाभरासाठी बंद करण्यात आला. मेट्रोला दिलेली मुदत 10 ऑक्टोबरला संपली असली तरी काम अद्याप सुरू आहे.
दरम्यान दिवाळीच्या काळात नागरिकांच्या सोयीसाठी भिडे पूल सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला होता, तर रात्री मेट्रोचे काम सुरू राहिले. आता हीच पद्धत कायम ठेवावी म्हणजे दिवसा पूल खुला आणि रात्री काम सुरू ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळेल आणि मेट्रोचे कामही थांबणार नाही असा नागरिकांचा विश्वास आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2025 8:47 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Bhide Bridge Update : पुण्यातील भिडे पूले दिवसा खुला ठेवण्याची मागणी; पालिका काय निर्णय घेणार?


