'ती' मागणी पूर्ण न झाल्यानं पुण्यातील पती बनला राक्षस; पत्नीला दगडानं ठेचलं, मग कोयता काढला अन्...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सोन्याचे दागिने आणि पैशांच्या हव्यासापोटी एका २५ वर्षीय विवाहितेवर तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
पिंपरी : सोन्याचे दागिने आणि पैशांच्या हव्यासापोटी एका २५ वर्षीय विवाहितेवर तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील बोपखेल परिसरातील रामनगरमध्ये शुक्रवारी (दि. ६) हा थरार घडला. याप्रकरणी पीडित महिलेने दापोडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.
सोन्यासाठी धक्कादायक कृत्य
फिर्यादी अंजलीकौर कुणालसिंग भोंड या आपल्या घरात असताना, पती कुणालसिंग याने सोन्याचे दागिने आणि रोकड देण्यासाठी त्यांच्याकडे तगादा लावला. या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हिंसाचारात झाले. संतापलेल्या कुणालसिंगने अंजलीकौर यांच्या डोक्यात आणि पायावर दगडाने प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, त्याने हातात कोयता घेऊन "तुला जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.
advertisement
सासरच्या मंडळींनीही दिली साथ
या हिंसाचारात केवळ पतीच नाही, तर सासरच्या इतर मंडळींनीही क्रूरतेची सीमा ओलांडली. सासरे किस्मतसिंग भोंड, दीर गुरुप्रितसिंग आणि कबिरसिंग यांनीही अंजलीकौर यांना हाताने आणि दगडाने बेदम मारहाण केली. एका महिलेला घरात कोंडून अशा प्रकारे जखमी केल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
दापोडी पोलिसांत गुन्हा दाखल
अंजलीकौर यांच्या फिर्यादीनुसार, पती कुणालसिंग भोंड (वय २९) याच्यासह सासरे आणि दोन्ही दिरांविरोधात दापोडी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या अंजलीकौर यांच्यावर उपचार सुरू असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे. घरगुती वादातून कोयत्याचा वापर आणि दगडाने करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे बोपखेल परिसरात खळबळ उडाली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 7:04 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'ती' मागणी पूर्ण न झाल्यानं पुण्यातील पती बनला राक्षस; पत्नीला दगडानं ठेचलं, मग कोयता काढला अन्...







