Pune Crime : 'आय लव्ह यू रिया...', पुण्यातील IT इंजिनियरने शेवटचा मेसेज पाठवला अन् लोणावळ्याच्या टायगर पॉईंटवरून संपवलं आयुष्य!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune baner IT worker Ends Life : पुण्यातील बाणेर येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 33 वर्षीय कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Pune Lonawala Tiger Point Death : गेल्या दीड महिन्यातील लोणावळ्यातील टायगर पॉइंटवरून आयुष्य संपवल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. दोन घटनांनी महाराष्ट्र हादरला असतानाच आता तिसरी घटना समोर आली आहे. पुण्यातील बाणेर येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 33 वर्षीय कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर पॉईंट येथील 250 फूट खोल दरीत उडी मारून या तरुणाने आपले जीवन संपवल्याचं समोर आलं आहे.. गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
8 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
वीरेंद्र वाल्मीकी सिन्हा असं मृत कर्मचाऱ्याचं नाव असून ते मूळचे नागपूरचे रहिवासी होते. या प्रकरणी त्यांची पत्नी रिया सिन्हा यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळेच वीरेंद्र यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानुसार मिलिंद दाणी, आचल श्रीवास्तव यांच्यासह एकूण 8 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
advertisement
आय लव्ह यू रिया, कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू
आत्महत्या करण्यापूर्वी वीरेंद्र यांनी आपल्या पत्नीला मोबाईलवर एक भावूक मेसेज पाठवला होता. "आय लव्ह यू रिया, कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू", असा उल्लेख करत त्यांनी आपल्या गाडीची लोकेशन आणि चावी कुठे ठेवली आहे याची माहिती दिली होती. हा मेसेज पाहताच रिया यांनी आपल्या मित्रांसह तातडीने लोणावळा गाठलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तिथं पोहोचल्यावर वीरेंद्र यांची गाडी आणि मोबाईल पोलिसांना मिळून आला.
advertisement
वरिष्ठ व्यवस्थापनाला व्हिडिओ मेल
तपासानुसार, वीरेंद्र यांनी मृत्यूपूर्वी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला एक व्हिडिओ मेल केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आठ व्यक्तींची नावं स्पष्टपणे सांगितली आहेत. बाणेरमधील विल्सकाड कंपनीत काम करताना त्यांना कशा प्रकारे त्रास दिला जात होता, याचे पुरावे या रेकॉर्डिंगमधून समोर येण्याची शक्यता आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील सर्व डिजिटल पुरावे जप्त केले असून पुढील तपास सुरू केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 10:01 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : 'आय लव्ह यू रिया...', पुण्यातील IT इंजिनियरने शेवटचा मेसेज पाठवला अन् लोणावळ्याच्या टायगर पॉईंटवरून संपवलं आयुष्य!










