advertisement

Pune Crime : पुण्यात 'मुळशी पॅटर्न' थरार, भारती विद्यापीठ परिसरात पाठलाग करून कोयत्याने सपासप वार!

Last Updated:

Pune koyta Attack : तरुण जीव वाचवण्यासाठी हल्लेखोरांच्या पाया पडत होता, गयावया करत होता, मात्र हल्लेखोरांनी त्यावर कोणतीही दया दाखवली नाही.

Pune Crime man chased and brutally attacked with koyta
Pune Crime man chased and brutally attacked with koyta
Pune Crime News : पुणे शहरात गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली आहे की नाही, असा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी एक घटना समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर भररस्त्यात कोयत्याने भीषण हल्ला करण्यात आला. 2 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजता ही घटना घडली असून, हल्ल्याचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदित्यवर कोयत्याने सपासप वार

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सुनील कांबळे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. लाकूड तोडण्यासाठी जसे घाव घातले जातात, तशाच क्रूर पद्धतीने आरोपी आदित्यवर कोयत्याने वार करत होते. तो तरुण जीव वाचवण्यासाठी हल्लेखोरांच्या पाया पडत होता, गयावया करत होता, मात्र हल्लेखोरांनी त्यावर कोणतीही दया दाखवली नाही. सध्या आदित्यवर हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
advertisement

डोक्यावर 30 पेक्षा जास्त टाके, प्रकृती चिंताजनक

या हल्ल्याचे मुख्य कारण अत्यंत धक्कादायक आहे. आरोपीच्या विरोधात एका मैत्रिणीला तक्रार देण्यास भाग पाडल्याचा राग मनात धरून हा खुनी हल्ला करण्यात आला. मारहाणीदरम्यान आदित्यच्या डोक्यावर 30 पेक्षा जास्त टाके पडले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, ज्यावेळी हा हल्ला सुरू होता, तेव्हा घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी होती, मात्र कोणामध्येही त्या तरुणाला वाचवण्याचे धाडस दिसले नाही.
advertisement

कुटूंबियांची संतप्त प्रतिक्रिया

या प्रकरणावरून आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप होत आहेत. एवढा भीषण हल्ला होऊनही भारती विद्यापीठ पोलिसांनी अद्याप 'खुनाचा प्रयत्न' केल्याचं कलम लावलेले नाही. केवळ इच्छापूर्वक हत्याराने जबर दुखापत केल्याचे कलम लावून पोलिसांनी गुन्हेगारांना एक प्रकारे सूट दिल्याची भावना आदित्यच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
advertisement

सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

दरम्यान, पुण्यातील कोयता गँगच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. भररस्त्यात सीसीटीव्ही समोर अशा घटना घडत असतील, तर सामान्यांच्या सुरक्षेचं काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यात 'मुळशी पॅटर्न' थरार, भारती विद्यापीठ परिसरात पाठलाग करून कोयत्याने सपासप वार!
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement