Pune News: पुणे महापालिकेत दिवसभरात 2 कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका; शिपायाचा मृत्यू, हे कारण आलं समोर

Last Updated:

पुणे महापालिका (PMC) भवनाच्या मुख्य इमारतीमध्ये गुरुवारी (४ डिसेंबर) दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची गंभीर घटना घडली

दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका (प्रतिकात्मक फोटो)
दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुणे महापालिका (PMC) भवनाच्या मुख्य इमारतीमध्ये गुरुवारी (४ डिसेंबर) दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची गंभीर घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेत रुग्णवाहिका उपलब्ध असूनही, त्यात डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे एका कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला. तर दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याला तातडीने उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रुग्णवाहिका सज्ज, पण डॉक्टरच गैरहजर
या घटनेनंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीत पूर्णवेळ डॉक्टर आणि कार्डिअॅक रुग्णवाहिका उपलब्ध असावी, या जुन्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. महापालिकेत अधिकारी, कर्मचारी आणि दररोज शेकडो नागरिक येत असल्याने, येथे आपत्कालीन वैद्यकीय सुविधा असणे अत्यावश्यक आहे.
महापालिकेच्या कार्यालयीन वेळेत किमान एक डॉक्टर आणि कायमस्वरूपी रुग्णवाहिका असावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होती. त्यानुसार रुग्णवाहिका उभी करण्यात आली, पण त्यात आवश्यक वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
advertisement
एकाच दिवशी दोन घटना
सकाळची घटना: सकाळी ११.३० च्या सुमारास पथ विभागातील शिपाई अशोक दशरथ वाळके (वय ५८) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. पालिकेतील डॉक्टरांनी त्यांना प्रथमोपचार केले, मात्र रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान चार तासांनंतर त्यांचे निधन झाले.
advertisement
दुपारची घटना: या घटनेच्या अवघ्या काही तासांनंतर, दुपारी ३.३० च्या सुमारास अकाउंट (लेखा) विभागातील महिला कर्मचारी छाया सुर्यवंशी यांनाही हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने प्राथमिक उपचार करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
कायमस्वरूपी आरोग्य केंद्राची मागणी
या दुर्दैवी घटनेमुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीत कार्डिअॅक ॲम्ब्युलन्स आणि कायमस्वरूपी छोटे आरोग्य केंद्र असावे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवता येतील, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणे महापालिकेत दिवसभरात 2 कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका; शिपायाचा मृत्यू, हे कारण आलं समोर
Next Article
advertisement
Mumbai Crime News: ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा निर्णय, जोगेश्वरीत खळबळ
ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा नि
  • ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा नि

  • ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा नि

  • ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा नि

View All
advertisement