Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या गोष्टी टाळाव्या? पाहा श्राद्ध तिथी आणि विधी
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pitru Paksha 2025: पितृपक्ष हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा काळ आहे, जो आपल्या पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी असतो. पितृपक्षातील श्राद्ध तिथींबाबत जाणून घेऊ.
पुणे : पितृपक्ष हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. या 15 दिवसांत आपल्या पितरांच्या आत्मशांतीसाठी विशेष पूजन, पिंडदान आणि धार्मिक विधी केले जातात. अशी मान्यता आहे की, या दिवसांत पितृदेव आपल्या घरी जेवणासाठी येतात. त्यांच्यासाठी नैवेद्य दाखविल्यास ते प्रसन्न होऊन कुटुंबावर कृपा करतात. त्यामुळे आयुष्यात सुख-शांती नांदते. तसेच या काळात केलेले पूजन आणि पिंडदान पितृदोष दूर करण्यास मदत करतात.
पितृपक्ष केव्हा सुरू होणार
पितृपक्ष हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा काळ आहे, जो आपल्या पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी 15 दिवसांचा असतो. यावर्षी पितृपक्ष भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला, 7 सप्टेंबरपासून, सुरू होऊन अश्विन कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत, 21 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या काळात पितर आणि पूर्वजांसाठी विशेष पूजन, पिंडदान व धार्मिक विधी पार पडतात.
advertisement
श्राद्ध तिथी आणि विधी
7 सप्टेंबर 2025, रविवार- पितृ पक्ष प्रारंभ, प्रौष्ठप्रदी पौर्णिमा
8 सप्टेंबर 2025, सोमवार – प्रतिपदा श्राद्ध
9 सप्टेंबर 2025, मंगळवार- द्वितीया श्राद्ध
10 सप्टेंबर 2025, बुधवार- तृतीया श्राद्ध / चतुर्थी श्राद्ध
advertisement
11 सप्टेंबर 2025, गुरुवार- पंचमी श्राद्ध / महा भरणी श्राद्ध
12 सप्टेंबर 2025, शुक्रवार- षष्ठी श्राद्ध
13 सप्टेंबर 2025, शनिवार- सप्तमी श्राद्ध
14 सप्टेंबर 2025, रविवार- अष्टमी श्राद्ध
15 सप्टेंबर 2025, सोमवार- नवमी श्राद्ध
16 सप्टेंबर 2025, मंगळवार- दशमी श्राद्ध
17 सप्टेंबर 2025, बुधवार- एकादशी श्राद्ध
18 सप्टेंबर 2025, गुरुवार- द्वादशी श्राद्ध
advertisement
19 सप्टेंबर 2025, शुक्रवार- त्रयोदशी श्राद्ध / मघा श्राद्ध
20 सप्टेंबर 2025, शनिवार- चतुर्दशी श्राद्ध
21 सप्टेंबर 2025, रविवार- सर्वपित्री दर्श अमावस्या
पितृपक्षात या गोष्टी करू नका
पितृपक्षाच्या 15 दिवसांच्या काळात काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. या काळात कोणतेही मोठे शुभ कार्य जसे की लग्न, नवीन घर घेणे, गाडी खरेदी करणे किंवा इतर नवीन वस्तू खरेदी करणे टाळावे. तसेच, या काळात केस कापणे देखील शक्यतो टाळावे. शास्त्रानुसार, या नियमांचे पालन न केल्यास कुटुंबावर किंवा स्वतःवर वाईट परिणाम होऊ शकतो. या नियमांचे पालन करून पितृपक्षाचा पुण्यलाभ मिळतो आणि पूर्वजांचे आशीर्वाद कुटुंबावर राहतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 06, 2025 1:57 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या गोष्टी टाळाव्या? पाहा श्राद्ध तिथी आणि विधी