राम दरबार दर्शन अन् हनुमानाचं विशाल रूप, कसा असणार नागपुरातील राम जन्मोत्सव? Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Vrushabh Ramesrao Furkunde
Last Updated:
राम जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विदर्भातील अनेक कलाकार नागपुरात येतात. श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ऋषभ फरकुंडे, प्रतिनिदी
नागपूर : संपूर्ण विदर्भात नागपूरच्या राम जन्मोत्सव सोहळ्याचे आकर्षण असते. दरवर्षी राम नवमीला नागपुरातील श्री पोद्दारेश्वर मंदिरात मोठा उत्सव असतो. सध्या 17 एप्रिलच्या राम जन्मोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. श्री पोद्दारेश्वर राम मंदिर आकर्षक आणि रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आले आहे. यंदा राम दरबार, हनुमानाचं विशाल रूप आणि इतर अनेक गोष्टी राम जन्मोत्सव मिरवणुकीचे खास आकर्षण असणार आहे.
advertisement
नागपुरात राम नवमीनिमित्त विविध मंडळांच्या मिरवणुका काढण्यात येतात. यामध्ये श्री राम भक्तांना भव्य राम दरबार, रावण वध, राधा-कृष्ण, शिव-पार्वती यांच्याशी संबंधित घटना पाहायला मिळणार आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी विदर्भातील अनेक कलाकार नागपुरात पोहोचणार आहेत. दुपारी 1 ते 10 वाजेपर्यंत मिरवणूक सुरू राहणार आहे. शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
advertisement
या सोबतच मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांना पाण्यासह सरबत देण्यासाठी ठिकठिकाणी भाविकांकडून स्टॉल लावण्यात येणार आहेत. पश्चिम नागपूर नागरिक संघ, रामनगर आयोजित रामनवमीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या काळात भजन-कीर्तन, गीत रामायण, श्री राम गीता, अभिषेक, नाटक, भक्तिगीत संध्या आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
advertisement
श्री राम दरबारचे दर्शन
श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून बाहेर पडणाऱ्या झांकीमध्ये सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असणारी हनुमानाची 7 फुटी मूर्ती असेल जी श्री राम आणि लक्ष्मण यांना खांद्यावर घेऊन जाताना दिसणार आहे. यासोबतच श्री राम आणि भगवान श्रीकृष्णाची 6 ते 6 फुटी मूर्तीही भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. यावेळी वानरसेना राम सेतू बांधतानाही दिसणार आहे. यासोबतच घोड्यावर बसलेले 7 फूट उंच बाबा रामदेव देखील सर्वांना आकर्षित करताना दिसणार आहेत.
advertisement
राजस्थानी कालकारांकडून शिव तांडव
ठिकठिकाणी निघणाऱ्या मिरवणुकीत राधा-कृष्णाची झाकी पाहायला मिळणार आहे. या वेळी डीजे, बँड आणि ऑर्केस्ट्रा देखील असेल. या सोबतच सीता हरणाच्या देखाव्या सोबतच वाल्मिकींनी रामायण लिहिण्याचा देखावाही भाविकांना आकर्षित राहिल. यावेळी, हरियाणा आणि राजस्थानमधील कलाकार शिव तांडव, शिव आपल्या केसांमधून गंगा काढतानाचा देखावा सादर करताना दिसतील. अंजनीच्या लाल हनुमानजींचे विशाल रूप सर्व शोभायात्रेत पाहायला मिळणार आहे. यादरम्यान भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण रथावर बसून जंगलात जाताना दिसतील.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
April 16, 2024 3:18 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
राम दरबार दर्शन अन् हनुमानाचं विशाल रूप, कसा असणार नागपुरातील राम जन्मोत्सव? Video