IND vs PAK : पाकिस्तानचं सरेंडर, वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध सामना होणार, ICC-PCB बैठकीत काय ठरलं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना होणार आहे. आयसीसी आणि पीसीबीच्या बैठकीनंतर हा निर्णय झाला आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना होणार आहे. आयसीसी आणि पीसीबीच्या बैठकीनंतर हा निर्णय झाला आहे. काल रात्री पाकिस्तानच्या लाहोरमध्ये आयसीसीचे प्रतिनिधी, बांगलादेशचे प्रतिनिधी आणि पाकिस्तान निवड समितीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर सामना खेळवण्याचा निर्णय झाला.
नेमका वाद काय?
या वादाची ठिणगी बांगलादेश संघाने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास दिलेल्या नकारापासून पडली. आयसीसीने बांगलादेशचा हा दावा फेटाळत त्यांना स्पर्धेतून बाहेर केले आणि त्यांच्या जागी 'स्कॉटलंड'ला संधी दिली. या निर्णयाच्या निषेधार्थ आणि बांगलादेशशी एकजूट दाखवण्यासाठी पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचे आदेश दिले होते.
पाकिस्तानच्या ३ अटी आणि 'आयसीसी'चा पवित्रा
advertisement
बहिष्काराचा पवित्रा घेतल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) हा सामना खेळण्यासाठी आयसीसीसमोर तीन मुख्य अटी ठेवल्या आहेत: १. द्विपक्षीय मालिकेचे पुनरुज्जीवन: भारतासोबत पुन्हा द्विपक्षीय क्रिकेट मालिका सुरू करावी. २. आयसीसी महसुलात वाढ: आयसीसीच्या उत्पन्नातील पाकिस्तानचा वाटा वाढवावा. ३. हँडशेक प्रोटोकॉल: २०१५ च्या आशिया चषक वादाचा संदर्भ देत, खेळाडूंमधील 'हँडशेक' (हस्तांदोलन) बाबत स्पष्ट धोरण असावे.
advertisement
मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार आयसीसीने यातील बहुतांश मागण्या फेटाळून लावल्या असून पाकिस्तानला 'फोर्स मॅज्योर' (Force Majeure) कलमांतर्गत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
लढत कोलंबोत का?
भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यामुळे आणि पाकिस्तानने भारतात येण्यास टाळाटाळ केल्यामुळे, हा सामना तटस्थ ठिकाणी म्हणजेच श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने यााधीच स्पष्ट केले आहे की, "आम्ही कोलंबोला जाण्यासाठी सज्ज आहोत, उर्वरित निर्णय बोर्डाचा असेल."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 7:52 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तानचं सरेंडर, वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध सामना होणार, ICC-PCB बैठकीत काय ठरलं?







