advertisement

Kumar Kushagra : कोण आहे शुभमनला रिप्लेस करणारा कुमार कुशाग्रा? इयान बिशन यांनी कुंडलीच काढली!

Last Updated:

Who is Kumar Kushagra : धोनीच्या तालमीतला पैलवान अन् सचिन सारखं टॅलेन्ट असलेला कुमार कुशाग्रा आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. यावर संशोधन इयान बिशन यांनी कुंडली शोधून काढलीये.

Who is Kumar Kushagra Ian Bishop laid out entire profile
Who is Kumar Kushagra Ian Bishop laid out entire profile
Ian Bishop laid out profile Of Kumar Kushagra : यंदाच्या आयपीएलमध्ये काहीसं वेगळं चित्र पहायला मिळतंय. ऑक्शनमध्ये सर्व फ्रँचायझींनी लंगड्या घोड्यांवर डाव लावणं सोडून दिलं. मागील दोन आयपीएल सिझनमध्ये काही युवा स्टार खेळाडू आले पण त्यांना दोन्ही सिझनमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, अशा खेळाडूंना लांबच ठेऊन नव्या युवा छाव्यांवर सर्व फ्रँचायझींनी डाव लावला होता. यातील एक नाव म्हणेच कुमार कुशाग्रा... अशातच या सर्वांची कुंडली काढण्याचं काम कुणी आपल्या डोक्यावर घेतलंय, तर ते आहेत प्रसिद्ध समालोचक इयान बिशप यांनी...

कुमार कुशाग्रा याची कुंडली मांडली

नवज्योतसिंग सिद्धूपेक्षा इयान बिशप यांची कॉमेन्ट्री ऐकण्याची इच्छा लोक व्यक्त करतात. कारण इयान बिशप यांचं समालोचन अर्थपूर्ण असून त्यांनी प्रत्येक लहान खेळाडूची कुंडली आधीच काढून ठेवलीये. त्यांचा अभ्यास इतका दांडगा आहे की, कोणत्याही युवा खेळाडूवर ते निबंध देखील लिहू शकतात. अशातच गुजरातचा युवा खेळाडू आणि शुभमन गिलच्या अनुपस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळालेल्या कुमार कुशाग्रा याची कुंडली इयान बिशप यांनी मांडली.
advertisement

धोनीमुळे क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात

इयान बिशप यांनी झारखंडच्या कुमार कुशाग्रच्या प्रेरणादायी प्रवासावर भाष्य करत कुमारचं तोंडभरून कौतुक केलं. झारखंड या मातीने भारतीय क्रिकेटला एमएस धोनीसारखे महान खेळाडू दिले असून, याच परंपरेतील कुशाग्र हा एक चमकता तारा असल्याचे बिशप यांनी म्हटलं. कुशाग्रने लहानपणापासूनच धोनीचा आदर्श समोर ठेवून क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती, असंही त्यांनी सांगितलं.
advertisement
advertisement

'कूच बिहार ट्रॉफी'मध्ये खोऱ्याने रन्स

कुशाग्रचा क्रिकेटमधील प्रवास स्थानिक अकादमींमधून सुरू झाला, जिथे त्याने आपल्यातील टॅलेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो केवळ एक आक्रमक मिडल ऑर्डर बॅटर नाही, तर एक चपळ विकेटकीपर म्हणूनही नावारूपास आला आहे. स्टेट क्रिकेटमध्ये अतिशय कमी वयात संधी मिळाली आणि त्याने त्याचं सोनं केलं. भारताची प्रमुख अंडर 19 डोमेस्टिक टूर्नामेंट असलेल्या 'कूच बिहार ट्रॉफी'मध्ये कुशाग्रने खोऱ्याने रन्स ओढले होते. याच स्पर्धेतील कामगिरीमुळे तो खऱ्या अर्थाने चर्चेत आला.
advertisement

नव्या छाव्याला संधी देणार का?

बिशप यांच्या मते, कुशाग्रसारख्या खेळाडूंमुळे भारतीय क्रिकेटची बेंच स्ट्रेंथ अधिक मजबूत होत असून, मोठ्या मॅचमध्ये प्रेशर हाताळण्याची त्याची क्षमता कौतुकास्पद आहे. त्यामुळे आता गुजरात टायटन्स धोनीच्या या नव्या छाव्याला संधी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजस्थानविरुद्ध कुमारने 18 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 3 फोर मारले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Kumar Kushagra : कोण आहे शुभमनला रिप्लेस करणारा कुमार कुशाग्रा? इयान बिशन यांनी कुंडलीच काढली!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement