नोकरीपेक्षा शेती निवडली, पपई शेतीतून उच्चशिक्षित तरुणाची महिन्याला 4 लाखांची कमाई
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
गंगापूर तालुक्यातील पुरी येथील उच्चशिक्षित तरुण रामेश्वर पवार हे पपई शेती करत आहे. एक एकर शेतामध्ये सात बाय सात वर 'तैवान 786' या वाणाची 1 हजार झाडांची लागवड मार्च 2025 मध्ये केली आहे.
छत्रपती संभाजीनगर: गंगापूर तालुक्यातील पुरी येथील उच्चशिक्षित तरुण रामेश्वर पवार हे पपई शेती करत आहे. एक एकर शेतामध्ये सात बाय सात वर 'तैवान 786' या वाणाची 1 हजार झाडांची लागवड मार्च 2025 मध्ये केली आहे. या पपई शेतीच्या माध्यमातून पवार यांना खर्च वजा करून 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. एकंदरीत पपई शेतीतून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी कशा पद्धतीने ही शेती करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
पपई शेती ही शेतकऱ्यांना फायदेशीरच आहे, मात्र यंदा परतीच्या पावसामुळे काही प्रमाणात पपई बागाचं नुकसान झालं आहे, झाडांची फळे गळली आहे तरी देखील सध्याच्या झाडांची स्थिती पाहता खत-औषधांसह इतर खर्च वजा करून 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न मिळेल असे रामेश्वर पवार यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले आहे. पपई झाडांना पोषण मिळावं म्हणून सुरुवातीच्या काळात रासायनिक खताचा जास्त वापर केला होता. आता मात्र शेणखताचा वापर करत आहे.
advertisement
शिवाय, जीवामृत, गोवमृत असे खत- औषध सध्या वापरत आहोत की ज्यामुळे जास्त खर्च होणार नाही आणि फळाला पोषकही ठरेल याबरोबरच ठिबक सिंचन द्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीने नियोजन करून पपई शेती केली जात असल्याचे देखील पवार यांनी म्हटले आहे. पपई शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना काही हरकत नाही, मात्र यामध्ये सातत्य आणि नियोजन पद्धती महत्त्वाची आहे. पपईचे उत्पन्न सर्व बाजारामधील पपईची विक्री आणि मागणीवर सर्व काही अवलंबून आहे. चांगल्या पद्धतीने शेती करून सरासरी काढली तर या शेतीचा खर्च वजा करून नफाही मिळू शकतो.
Location :
Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 8:37 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
नोकरीपेक्षा शेती निवडली, पपई शेतीतून उच्चशिक्षित तरुणाची महिन्याला 4 लाखांची कमाई










