मुंबई: विधानसभा निवडणुकाजवळ आहेत, विधानसभेचं वारं वाहू लागलंय. मनसेने एकला चलो रे चा नाराही दिला आहे. त्यामुळे उत्सुकता वाढली की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी लालबागच्या राजाकडे नेमकं काय मागितलं असावं? आज लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले राज ठाकरे. यावेळी तब्बल एक मिनिट 16 सेकंद राज ठाकरे गणपतीच्या पायावर आपलं डोकं ठेवून होते. लालबागच्या राजाच्या चरणी देशातले बडेबडे राजकीय नेते नतमस्तक होतात. कालच देशाचे गृहमंत्री अमित शहा आले होते, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनीही राजाचं दर्शन घेतलंय. पण तब्बल एक मिनीटभर गणपतीच्या पायाशी माथा टेकवून राज ठाकरेंनी कोणतं हितगुज साधलं, याची उत्सुकता आहे.
गणेशोत्सवात बाप्पांच्या प्रसादासाठी मोदकासह विविध फळांचाही नैवेद्य दाखवला जातो. गणेशोत्सवात प्रसादासाठी आणि पूजेसाठीही केळींना मागणी असते. त्यामुळेच पुण्यातील गुलटेकडी मार्केट मध्ये फळांच्या किमती १० ते १५ टक्के वाढल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचे पुन्हा एकदा जोरदार आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यात उद्या पावसाची काय परिस्थिती असेल याचबाबत घेतलेला हा आढावा.
गव्हाच्या पिठाचे गोड गुलगुले शरीरासाठी पौष्टिक तर असतातच पण चविष्टसुद्धा असतात. नेमकं हे गोड गुलगुले कसे तयार करतात, याची रेसिपी काय आहे, ते जाणून घेऊयात.
ममता बाविस्कर आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून आज तब्बल 16 महिलांना रोजगारही पुरवत आहेत. एका मोदकपासून सुरू झालेला त्यांचा हा व्यवसाय आज तब्बल 5 हजार ते 6 हजार मोदकांवर पोहोचला आहे. नेमका हा प्रवास कसा सुरू झाला, याचबाबत आपण जाणून घेऊयात.
गणेशोत्सवात कोकणात अनेक ठिकाणी प्रसादासाठी लापशी बनवली जाते. तुम्हीसुद्धा हा पदार्थ प्रसादासाठी तयार करू शकतात. पण नेमका हा पदार्थ कसा तयार केला जातो, याची रेसिपी काय आहे, हे जाणून घेऊयात.