प्रसिद्ध गायक आणि गझलकार पंकज उधास यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘चिट्ठी आई है’, ‘चांदी जैसा रंग है तेरा’, ‘रिश्ता तेरा मेरा’, ‘न कजरे की धार’, ‘मत कर इतना गुरूर’, ‘आदमी खिलौना है’ ते ‘जीए तो जीए कैसे’ अशी अनेक सुपरहिट गाणी देणारे पंकज उधास आज आपल्यात नाहीयेत. त्यांच्या निधनानं हळहळ व्यक्त केली जातेय. आज पंकज उधास यांच्या आयुष्याविषयी जाणून घेऊया काही गोष्टी.