काल अज्ञात माथेफिरूकडून संविधानाचा अपमान करण्यात आला या पार्श्वभूमीवर आज परभणीत बंद पुकारण्यात आला होता. आजच्या बंद दरम्यान अचानकपणे जमाव आक्रमक झाला. काही ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. तर, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाची नासधूस करण्यात आली. काही दुकानांच्या पाट्या तोडण्यात आल्या. काही ठिकाणी जमाव नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर, काही ठिकाणी सौम्य लाठीमार केला.



