15 वर्षांपूर्वी लागवड, आजही लाखोंचं उत्पन्न, बोरांची बाग कशी ठरली शेतकऱ्यासाठी उत्पन्नाचं साधन? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
औदुंबर यांनी सुमारे 1 हजार झाडांचे यशस्वी आणि उत्कृष्ट संगोपन केल्यानेच प्रतिझाड 150 ते 200 किलोच्या संख्येने भरभरून उत्पादन ही बाग देत आहे. यावर्षी शेतकरी औदुंबर यांना बोरांच्या विक्रीतून आतापर्यंत 18 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : शेतामध्ये शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी या गावातील शेतकरी औदुंबर रणदिवे यांनी 15 वर्षांपूर्वी लावलेल्या चमेली आणि उमरान जातीच्या बोराची बाग अत्यंत कष्टाने जोपासली आहे. औदुंबर यांनी सुमारे 1 हजार झाडांचे यशस्वी आणि उत्कृष्ट संगोपन केल्यानेच प्रतिझाड 150 ते 200 किलोच्या संख्येने भरभरून उत्पादन ही बाग देत आहे. यावर्षी शेतकरी औदुंबर यांना बोरांच्या विक्रीतून आतापर्यंत 18 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
advertisement
कमी पाण्यात उत्कृष्ट नियोजनातून औदुंबर रणदिवे यांनी ही बोरांची बाग केली आहे. 5 एकरात 15 बाय 15 वर त्यांनी चमेली आणि उमरान जातीच्या बोरांचे झाड लावले आहे. सुरुवातीला दोन ते तीन वर्ष बाग नेटवायला जाते. ढगाळ वातावरणात त्यावर फवारणी द्यावे लागते.
advertisement
या बागेला फक्त फवारणीचा कष्ट जास्त आहे. मग थेतून वर्षाला 2 ते 5 लाख उत्पन्न बोरांच्या विक्रीतून मिळायला सुरुवात होते. दर वर्षाला झाडाला बोरांची लागवड ही वाढत जाते आणि उत्पन्न ही वाढत जातो. या वर्षी औदुंबर रणदिवे यांनी बोरांच्या विक्रीतून 18 लाखांचे उत्पन्न घेतलं असून बोरांच्या बागेत आणखीन चमेली आणि उमरान बोरांची तोडणी सुरू असून या बोर विक्रीतून 22 लाखांचे उत्पन्न शेतकरी औदुंबर रणदिवे यांना मिळणार आहे.
advertisement
चमेली आणि उमरान बोरांना बाजारात चांगली मागणी आहे. सद्या बाजारात या बोरांना सरासरी 25 ते 30 रूपये किलो भाव मिळत आहे. औदुंबर रणदिवे या बोरांची विक्री पुणे येथील एका व्यापारास विकत आहेत. युवा तरुणानी नोकरीच्या मागे न धावता जर त्याच्या कडे शेती असेल तर योग्य पिकांची माहिती घेऊन कमी दिवसात जास्त उत्पन्न देणारे पीक किंवा एकदा पीक घेऊन वर्ष उत्पन्न देणारे पिक याची माहिती घेऊन पिकांची लागवड केली तर नक्कीच युवा शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होईल, असा सल्ला शेतकरी औदुंबर रणदिवे यांनी दिला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
January 20, 2025 2:17 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
15 वर्षांपूर्वी लागवड, आजही लाखोंचं उत्पन्न, बोरांची बाग कशी ठरली शेतकऱ्यासाठी उत्पन्नाचं साधन? Video