एकरी 152 टन ऊस उत्पादन कसं घेतलं? शेतकऱ्यानं सांगितलं A टू Z टेक्निक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Sugarcane Farming: एकरी 152 उतारा घेतलेल्या शेतात श्रीकांत गवळी यांनी एकही पाठपाणी दिले नाही हे विशेष आहे. संपूर्ण प्लॉट हा केवळ ठिबकच्या सहाय्याने वाढवला.
अतिशय कमी श्रम असणारं पीक म्हणून ऊस शेतीकडे पाहिले जाते. परंतु, ऊस हे आळशी नव्हे तर काटेकोर व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक असल्याचं सांगलीतील शेतकऱ्यानं सिद्ध केलंय. श्रीकांत सुरेश गवळी यांनी एकरी 152 टन उच्चांकी ऊस उत्पादन घेतले आहे. गेल्या 8-10 वर्षांपासून जमिनीची तयारी केल्यानंतर एकरी 152 टनाचा उतारा काढणं शक्य झाल्याचं गवळी यांनी सांगितलं.
advertisement
श्रीकांत सुरेश गवळी हे सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील रामपूरचे सुशिक्षित शेतकरी आहेत. त्यांच्याकडे एकूण सात एकर शेती असून यापूर्वी ते भाजीपाला पिकवत होते. 2019 पासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह ते सात एकर उसाची शेती करत आहेत. ऊस पिकाबाबत स्वतःच्या अभ्यासासह त्यांनी गन्ना मास्टर या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळेच एकरी 152 टन विक्रमी ऊस उत्पादन घेणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ऊस लागवडीनंतर 39 व्या दिवशी जेठा काढला. 60 व्या दिवशी बैलांच्या सहाय्याने बाळभरणी केली. 90 व्या दिवशी पॉवर टेलरने हलकी भरणी दिली. 111 व्या दिवशी मोठी भरणी दिली. कुठल्याही प्रकारची चालढकल न करता श्रीकांत गवळी यांनी करेक्ट नियोजन केल्याने त्यांना जोमदार ऊस पिकवता आला. एका ऊसास 50-55 कांड्या तर चार-पाच इंच पेराजाडी वाढली.
advertisement
advertisement
श्रीकांत गवळी यांनी 152 उतारा घेण्यासाठी गन्ना मास्टर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. गन्ना मास्टर तंत्रज्ञान ही ऊस अभ्यासक आणि प्रयोगशील उत्पादकांनी एकत्र येऊन सुरू केलेले आधुनिक ऊस उत्पादनाचे तंत्र आहे. यामध्ये रासायनिक खते आणि पाण्याचा योग्य आणि आवश्यक वेळी वापर करत, ऊस उत्पादन वाढीवर भर दिला जातो.
advertisement
युवा शेतकरी श्रीकांत गवळी यांना शेती कामामध्ये पत्नी, मुलगा आणि आई-वडिलांची मोठी साथ आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने केलेल्या त्यांच्या शेतीस अनेक शेतकरी आवर्जून भेट देवून सल्ला घेतात. ऊस हे आळशी लोकांचे नव्हे तर करेक्ट व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक असल्याचे श्रीकांत सांगतात. (प्रीती निकम, प्रतिनिधी)