महाराष्ट्रातलं रताळ्याचं गाव! 10 दिवसांत दीड कोटींची उलाढाल, पण यंदा फटका, काय स्थिती? Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Jalna news: महाशिवरात्रीच्या आधी दहा दिवस शेतातील रताळी काढण्याचीच लगबग सुरू असते. दरवर्षी या दहा दिवसाच्या काळात तब्बल दीड कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते.
जालना: प्रत्येक गावाची वेगळी अशी ओळख असते. जालना जिल्ह्यातील एक गाव चक्क रताळ्याचे गाव म्हणून ओळखले जाते. गावातील प्रत्येक शेतकरी करत असलेल्या रताळी शेतीमुळे गावाला ही ओळख मिळाली. या गावात महाशिवरात्रीच्या आधी दहा दिवस शेतातील रताळी काढण्याचीच लगबग सुरू असते. दरवर्षी या दहा दिवसाच्या काळात तब्बल दीड कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. याच रताळ्याच्या गावाबद्दल लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील प्रत्येक शेतकऱ्याने रताळी शेती केली आहे. सध्या नांगराच्या सहाय्याने रताळी शेताबाहेर काढण्याचे काम सुरू आहे. गावात मजूर मिळत नसल्याने आसपासच्या परिसरातील महिला 300 रुपये रोज याप्रमाणे कामाला येतात, असे गावकरी सांगतात.
यंदा उत्पादनाला फटका
यंदा पावसाळा जास्त झाला त्यामुळे किड रोग अधिक प्रमाणात आले. खत औषधी यांवर अधिकचा खर्च झाला. मधल्या काळात धुके देखील होते. यामुळे रताळी पाहिजे तशी वाढली नाहीत. महाशिवरात्री देखील यंदा जरा लवकर आली आहे. या सगळ्यांचा उत्पादनावर परिणाम झाला आहे, असंही गावकऱ्यांनी सांगितलं.
advertisement
सध्या रताळ्याचे बाजार निघाले नाहीत. परंतु, 12 ते 15 रू प्रति किलो असे दर मिळतील अशी अपेक्षा आहे. दरवर्षी एकरी 150 क्विंटल उत्पादन मिळते. यंदा हेच 100 ते 120 क्विंटल पर्यंत मिळेल. तरीही 80 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होईल, अशी अपेक्षा गावचे पोलिस पाटील राजेश टाकळकर यांनी व्यक्त केली.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 12:22 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
महाराष्ट्रातलं रताळ्याचं गाव! 10 दिवसांत दीड कोटींची उलाढाल, पण यंदा फटका, काय स्थिती? Video






